ETV Bharat / state

अंधश्रद्धेचा कळस! 22 दिवसांच्या चिमुकलीच्या पोटावर दिले गरम विळ्याचे चटके, उपचाराच्या नावाखाली केलं संतापजनक कृत्य

मेळघाटात एका 22 दिवसांच्या चिमुकलीला उपचाराच्या नावाखाली गरम विळ्याचे चटके देण्यात आले आहेत. या प्रकरणी चिमुकलीच्या नात्यातीलच एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

superstition
मेळघाटात अंधश्रद्धेचा कळस! (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 6, 2025 at 4:29 PM IST

|

Updated : July 6, 2025 at 6:43 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

अमरावती : मेळघाटातून एक अतिशय संतापजनक बातमी समोर आली आहे. चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावात 22 दिवसांच्या चिमुकलीला उपचाराच्या नावाखाली विळा गरम करून चटके देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन घरातील सदस्यांनीच हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी नात्यातीलच एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपचाराच्या नावाखाली चिमुकलीला दिले चटके : वास्तविक दहेंद्री गावातील धोंडू शेलुकर यांच्या 22 दिवसांच्या चिमुकलीच्या पोटाला सूज आली होती. यामुळे चिमुकली सतत रडत होती. यावर उपचार म्हणून चिमुकलीच्या काकूनं चिमुकलीच्या पोटावर गरम विळ्यांनं चटके दिले. या क्रूर आणि संताप आणणाऱ्या घटनेची माहिती मिळताच आरोग्य सेविकेनं शेलूकर यांच्या घरी धाव घेतली आणि बाळाला काटकुंभ येथील प्रथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यावर बाळाला अचलूर येथील महिला आणि बाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

प्रकरणाची माहिती देताना पोलीस निरिक्षक (ETV Bharat Reporter)

उपचारामुळं बचावलं बाळ : दरम्यान, या 22 दिवसांच्या चिमुकलीला वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्यानं ती बचावली आहे. आता चिमुकलीची प्रकृती धोक्याबाहेर असून, आई आणि चिमुकली दोघींना सुट्टी देण्यात आल्याची माहिती अचलपूर येथील महिला आणि बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक अग्रवाल यांनी दिली. विशेष म्हणजे या चिमुकलीच्या आईला आणखी एक दीड वर्षाचं बाळ आहे.

60 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल : अंधश्रद्धेच्या या गंभीर प्रकरणात चिखलदरा पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र जादूटोणा कायद्याच्या विविध कलमांतर्गत मेजो कसदेकर या 60 वर्षीय महिलेवरोधात गुन्हा दाखल केलाय. तसेच पुढील तपास सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी दिली.

हेही वाचा

Last Updated : July 6, 2025 at 6:43 PM IST