कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी, सर्वांधिक पाऊस कुठे? जाणून घ्या...
राज्यात मुसळधार पावसानं जोर धरलाय. विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरदार बरसतोय.

Published : June 24, 2025 at 1:18 PM IST
मुंबई : विदर्भातील काही भाग वगळता पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं राज्यातील धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ झाली आङे. तर दुसरीकडे राज्यात गेल्या 24 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळं दरड कोसळणे, भिंत कोसळणे, यामुळं काहीजण जखमी झाल्याचीही घटना घडल्या आहेत. पाहू या गेल्या 24 तासात सर्वांधिक पाऊस कुठे झाला आहे...
सर्वांधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात? :
- - पालघर 82.2 मि. मी
- - रायगड 82.2 मि. मी
- - मुंबई शहर 61.2 मि. मी
- - ठाणे 59.3 मि. मी
- - रत्नागिरी 50.6 मि. मी
ऑरेंज अलर्ट कुठे? : राज्यातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला मंगळवारी संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून ते बुधवारी रात्री 8.30 वाजेपर्यंत 4.2 मीटर उंच लाटांचा इशारा इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसकडून देण्यात आला असून, लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर : मुसळधार पावसामुळं कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि रायगडमधील कुंडलिका नदी इशारा पातळीवर आहे, याबाबत नागरिकांना अलर्ट करण्यात आले आहे. तर पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीत पाणी पातळी वाढल्याने एक बोट नदीत अडकली होती. मात्र, ही बोट NDRF च्या पथकाच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आली. पुणे जिल्ह्यातील माळीण, आंबेगाव येथे जमिनीला भेगा पडून दरड कोसळली. अशा अनेक घटना राज्यात मुसळधार पावसामुळे घडल्या आहेत.
ऑरेंज अलर्ट म्हणजे काय? : ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाचा इशारा, ज्यामुळे नैसर्गिक आपत्तीची शक्यता असते. याचा अर्थ असा की, कोणत्याही क्षणी जोरदार किंवा अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पूर, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीस अडथळा, वीजपुरवठा खंडित होणे अशा समस्या येऊ शकतात. नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला दिला जातो.
हेही वाचा -

