मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यानं क्रिकेटनंतर आता राजकारणात आपली इनिंग सुरू केलीय. केदार जाधव यांनी भाजपात प्रवेश केला असून, आज मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाचा बिल्ला आणि शाल देऊन केदार यांना भाजपचे सदस्यत्व दिले.
मोदी-फडणवीसांची कामगिरी, प्रेरणादायी : भाजपात प्रवेशानंतर केदार जाधव म्हणाला की, "२०१४ मध्ये केंद्रात भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून मला मिळालेले प्रेम आणि पाठिंबा व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, ती मला खूप प्रेरणादायी वाटते. माझे ध्येय त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपासाठी जे काही छोटे योगदान देता येईल, ते करणार आहे. तसंच मला पूर्ण विश्वास आहे की, मला जी काही जबाबदारी मिळेल, ती मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन", असं केदार जाधव यांनी सांगितलं.
सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा : दरम्यान, केदार जाधवनं गेल्या वर्षी जूनमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. केदार जाधवनं वयाच्या ३९ व्या वर्षी भारतासाठी शेवटचा सामना ८ फेब्रुवारी २०२० रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला. चार सामन्यांच्या वन डे मालिकेत त्यानं फक्त ३५ धावा केल्या. या मालिकेत, त्याला फक्त दोन सामन्यांमध्ये प्लेइंग ११ चा भाग बनवण्यात आलं.
हेही वाचा :
ठरलं तर मग! लाडक्या बहिणीचा एप्रिलचा हप्ता कधी येणार, 'या' तारखेला जमा होणार खात्यात पैसे
दीनानाथ रुग्णालयातील प्रकरणानंतर पुणे महापालिकेकडून शहरातील ८५० खासगी रुग्णालयांना नोटीस