ETV Bharat / state

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांनी केली आत्महत्या, मृतकाच्या खिशात सापडली सुसाईड नोट - Nagpur Suicide

Nagpur Suicide case : नागपुरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या (Suicide) करून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ माजली आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2024, 5:19 PM IST

Nagpur Suicide
नागपूर आत्महत्या प्रकरण (File Photo)

नागपूर Nagpur Suicide : एकाच कुटुंबातील चौघांनी राहत्या घरात सामूहिक आत्महत्या (Suicide) केल्याची घटना (Nagpur Crime News) जिल्ह्यातील मोवाड येथे घडली आहे. विजय मधुकर पाचोरी (६८) माला विजय पचोरी (५५) गणेश विजय पचोरी (३८) आणि दीपक विजय पचोरी (३६) अशी आत्महत्या करणाऱ्या चौघांची नावं आहेत. पोलिसांना एका मृतकाच्या खिशात सुसाईड नोट मिळून आली असून त्यावर सर्वांच्या सह्या देखील आहेत.

एकाच कुटुंबातील चौघांनी केली आत्महत्या : या घटनेची माहिती समजल्यानंतर मोवाड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घराचं दार आतून बंद होतं. पोलिसांनी दार उघडून घरात प्रवेश केला तेव्हा घरातील चौघांचे मृतदेह दिसून आले. पोलिसांनी सर्व मृतदेहाचा पंचनामा केला असता गणेश विजय पचोरीच्या खिश्यात एक सुसाईड नोट आढळून आली. त्यावर सर्वांनी आत्महत्या करण्यापूर्वी सह्या केलेल्या आहेत. पोलिसांनी चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरला पाठवून पुढील तपास सुरू केलाय.

प्रतिक्रिया देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ (ETB Bharat Reporter)

या कारणाने कुटुंबाने केली आत्महत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश पचोरी हा 'मातृ सेवा इंडिया निधी पतसंस्थे'चा संचालक आहे. फेब्रुवारीमध्ये त्याच्यावर फसवणूकीचा एक गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्याला अटक देखील झाली होती. ऑगस्ट महिन्यात गणेश पचोरी जामिनावर बाहेर आला होता. मात्र या प्रकरणात या कुटुंबाची प्रचंड बदनामी झाली होती, या कारणाने आत्महत्या केली असल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सहा महिन्याच्या बाळासह केली आत्महत्या : अशीच एक घटना आज छत्रपती संभाजीनगरमध्येही घडली आहे. एका महिला डॉक्टरनं सहा महिन्याच्या बाळासह आत्महत्या केली आहे. पतीही डॉक्टर असताना तरुण महिला डॉक्टरनं अचानक असं पाऊल उचलल्यानं सगळीकडं हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा -

  1. छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा महिन्याचा बाळासह महिला डॉक्टरची आत्महत्या - Female doctor suicide
  2. आत्महत्या प्रकरणानंतर आयआयटीत विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, प्रवेशावेळी वैद्यकीय तपासणी अनिवार्य - IIT GUWAHATI
  3. धक्कादायक! वडिलांसह 4 मुलींची आत्महत्या, दिल्लीतील रंगपुरी भागातील घटना - Father Suicide with 4 Daughters

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.