वर्धा : वर्ध्यामध्ये कारची टँकरला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय. पोलीस कर्मचाऱ्याचं संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत्यूमुखी पडलं. वर्ध्याच्या तरोडानजीक हा अपघात झाला. पती-पत्नी आणि दोन मुलं असे चौघे या अपघातात ठार झाले. हे कुटुंब मांडगाव येथून वर्ध्याकडे येत असताना कारची टँकरला धडक बसली.
पोलीस दलात कार्यरत होते : वर्धा जिल्ह्यातील मांडगाव येथे कार आणि टँकरमध्ये झालेल्या धकडेत एकाचं कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. मृत प्रशांत वैद्य हे त्यांची पत्नी प्रियंका आणि दोन मुलांसह जेवायला गेले होते. परत येताना कार समोर रानडुक्कर आलं. त्यामुळं प्रशांत वैद्य यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी त्यांची कार समोरून येणाऱ्या टँकरला धडकली. यामध्ये वैद्य कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला. प्रशांत वैद्य हे वर्धा पोलीस दलात कार्यरत होते. अपघातात प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर प्रशांत वैद्य आणि मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रान डुकरानं केला घात : एक कुटुंब कारनं प्रवास करत होतं. यावेळी अचानक एक रान डुक्कर या कारसमोर आलं. चालकानं ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट समोरून येणाऱ्या टँकरवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्थानिकांनी केली मदत : अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. गंभीर जखमींना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा -