ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात प्रवीण परदेशी मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त होणार! - PRAVEEN PARDESHI

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवालय कार्यालयात निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी हे लवकरच मोठी जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Praveen Pardeshi, Devendra Fadnavis
प्रवीण परदेशी, देवेंद्र फडणवीस (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 12, 2025 at 6:18 PM IST

1 Min Read

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवालय कार्यालयात निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी हे लवकरच मोठी जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे 2014 रोजी प्रवीण परदेशी यांनी अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती. यानंतर आता त्यांना मुख्यंत्र्यांच्या सचिवालय कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात : निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आणि जवळचे मानले जातात. प्रवीण परदेशी आणि देवेंद्र फडणवीस यांचे खास संबंध आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात प्रवीण परदेशी यांनी अतिरिक्त मुख्य सचिवपदाचे काम पाहिले होते. प्रवीण परदेशी यांच्या कामाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच समाधानी राहिलेले आहेत. याचबरोबर, प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळली होती. मात्र आता निवृत्तीनंतर प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सचिवालय कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नवी जबाबदारी सांभाळणार आहेत.

'मित्रा' संस्थेचे अध्यक्ष : प्रवीण परदेशी यांनी काही काळ राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते. प्रवीण परदेशी हे सध्या 'मित्रा' या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि राज्याची अर्थव्यवस्थेला गतीमान करण्यासाठी अनुभवी प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवालय कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त केले जाणार आहे.

प्रवीण परदेशी यांनी सांभाळलेली जबाबदारी
- परदेशी हे 1985 च्या आयएएस बॅचमधील अधिकारी आहेत.
- 'मित्रा' या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष
- मुंबई हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष
- बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष
- फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळात परदेशी अतिरिक्त मुख्य सचिवपद भूषविले
- यानंतर त्यांना आता मुख्यमंत्र्यांच्या सचिवालय कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

हेही वाचा :

  1. मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय? मग, रेल्वेचं 'हे' वेळापत्रक वाचा; मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक!
  2. अखेर 'लुटेरी दुल्हन' पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमध्ये सासरच्यांना गुंगीचे औषध देऊन दागिन्यांसह झाली होती पसार
  3. पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा, डोंगरावर 'चांगभलं'चा गजर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.