ETV Bharat / state

नागपुरात जखमी वाघाच्या बछडयाचं यशस्वी रेस्क्यू - TIGER CUB RESCUE NAGPUR

नागपूरमध्ये जखमी वाघाच्या बछडयाचे यशस्वी रेस्क्यू करत वनविभाग आणि वन्यप्राणी बचाव पथकानं त्याला जीवनदान दिले.

tiger cub rescue nagpur
जखमी वाघाच्या बछडयाचं यशस्वी रेस्क्यू (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 21, 2025 at 9:04 PM IST

1 Min Read

नागपूर : वनविभाग व वन्यप्राणी बचाव पथकानं सोमवारी एका वाघाच्या जखमी बछडयाचे यशस्वी रेस्क्यू केले. बछड्याच्या एका पायाला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे जखमी बछडयाला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरला उपचारासाठी पाठवण्यात आले होते. उपचारानंतर त्याला जंगलात सोडले जाणार आहे.

बछड्याचं सुखरुप रेस्क्यू : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या खापरी नियतक्षेत्र सिंदिविहीरी येथील संतोष ठाकरे यांच्या शेताजवळ एका नाल्यात अंदाजे आठ ते नऊ महिन्याचा- वाघाचा बछडा बसून असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे यांना देण्यात आली. त्यानंतर लगेच सहायक वनसंरक्षक मनोज धनविजय, वन्यप्राणी बचाव पथकाचे कुंदन हाते यांना माहिती देऊन वनपरिक्षेत्र बुटीबोरी आणि ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर येथील पथकाने संयुक्तरित्या मोहिम राबवून वाघाच्या मादी बछडयाचे रेस्क्यु केले.

तीन पायांचे ठसे आढळले : छडयाचे रेस्क्यु करण्यापूर्वीच लक्षात आले होते की बछडा हा जखमी असावा. त्याच्या पायाचे ठसे हे तीनच पायाचे दिसून आल्यानंतर तो जखमी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर वाघाच्या बछडयाचे फिजिकल रेस्क्यू करून तपासणी केली असता बछडयाच्या पुढील उजव्या पायाला जखम असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला उपचाराची गरज असल्याने वन्यप्राणी बचाव केंद्र ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर येथे रवाना करण्यात आले.

आठ दिवसांपूर्वी केले होते बिबट्याचे रेस्क्यु : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी वन परिक्षेत्रातील समृद्धी महामार्गाच्या लगत असलेल्या शेतातील कुंपणात एक मादी बिबट अडकून पडला होता. त्याला कोणतीही इजा होऊ न देता सुखरूपपणे रेस्क्यू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे रेस्क्यू करुन जंगलात सोडून देण्यात आले.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाजवळील कुंपणात अडकला बिबट्या; राबवलं फास्ट रेस्क्यू ऑपरेशन अन् केली सुटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.