ETV Bharat / state

सुप्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांची अडीच कोटींची पेंटिंग गेली चोरीला - SH Raza Painting Stolen

SH Raza Painting Stolen : जगप्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा यांच्या कोट्यवधी रुपयांच्या चित्रांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एस. एच. रझा यांनी 1992 साली बनवलेलं ‘प्रकृति’ नावाचं हे पेंटिंग आहे, त्याची किंमत अंदाजे अडीच कोटी रुपये आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2024, 10:14 PM IST

Updated : Sep 10, 2024, 10:27 PM IST

Famous Painter SH Raza
सुप्रसिद्ध चित्रकार एस.एच रझा (संग्रहित छायाचित्र)

मुंबई SH Raza Painting Stolen : सुप्रसिद्ध चित्रकार एस एच रझा यांच्या चित्राची ऑक्शन हाऊस मधून चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी भारतीय दंड संविधान कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांनी दिली आहे.

ऑक्शन हाऊसमधून अडीच कोटीच्या चित्राची चोरी : 1992 साली काढलेल्या "प्रकृती" नावाच्या चित्राची चोरी करण्यात आली आहे. चित्राची किंमत अडीच कोटी इतकी आहे. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञातविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोर्टमधील बॅलार्ड पिअर येथील ऑक्शन हाऊसमधून हे पेंटिंग (चित्र) चोरीस गेलं आहे.

'प्रकृती' नावाच्या चित्राची चोरी : मार्च 2022 ते मे 2024 या काळात हे पेंटिंग चोरीस गेले असल्याची तक्रार तक्रारदार सिद्धांत महेश शेट्टी (वय 37) त्यांनी दिली आहे. सिध्दांत शेट्टी बॅलार्ड पियर येथील कुमठा स्ट्रीट येथे असलेल्या ग्यान भवनमधील गुरु ऑक्शन हाऊस प्रा. लि. ही कंपनी आहे. ज्येष्ठ चित्रकार एस. एच रझा यांचे 'प्रकृती' नावाची चित्र जे 1992 मध्ये त्यांनी ॲक्रेलिकवर ऑन कॅनव्हासवर बनवलेले चित्र आहे. त्याची लांबी 47.2 इंच तर रुंदी 15.7 इंच इतकी आहे.

2016 मध्ये मृत्यू : तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2022 ते मे 2024 या कालावधीत गुरु ऑक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेडच्या गोडाऊनमध्ये ठेवलेले चित्रकार एस. एच रझा यांचे चित्र अज्ञात चोरटाने गोडाऊन मधून प्रवेश करून लबाडीने चोरून नेलं, म्हणून अज्ञात इसमाविरुद्ध तक्रारदार सिद्धांत शेट्टी यांनी तक्रार केली आहे. ज्येष्ठ चित्रकार एस. एच रझा यांचा 2016 मध्ये मृत्यू झाला असून ते फ्रान्समध्ये राहत होते.

हेही वाचा -

  1. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शिकेच्या घरी चोरी, आरोपीच्या मुसक्या आवळल्या - The money was stolen
  2. शोरुम फोडण्यापूर्वी 'भगदाड गँग' काय करायची? पोलिसांना चकवा देण्याकरिता चक्रावून जाणारे कारनामे - Thane Crime News
  3. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या भाकरीतील चंद्रामुळे चोराला आत्मभान, माफीचं पत्र लिहून परत केलं साहित्य - NARAYAN SURVE News

Last Updated : Sep 10, 2024, 10:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.