मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या अद्ययावत आपत्कालीन कार्य केंद्रामुळे अचूक आणि आपत्तीच्या वेळी जलद होणार आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात आधुनिक वेगवान संवादव्यवस्था आणि तंत्रज्ञान तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरामुळे राज्याला अधिक सक्षमपणे बळ मिळाले असून, आपत्ती व्यवस्थापनाला तंत्रज्ञानाचे बळ मिळाले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थितीत होते.
आपत्ती व्यवस्थापनासाठी सशक्त कमांड : दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनासाठी एक सशक्त कमांड आणि कम्युनिकेशन सिस्टीमसाठी उपयोगी ठरेल. तसेच निर्णय लवकर घेता यावेत, जलद प्रतिसाद देता यावा, यासाठी हे केंद्र कामी येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हवामानातील बदलामुळे आपत्तीचे स्वरूप, तीव्रता आणि वारंवारता बदलत आहे. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यातही अशा प्रकारची आधुनिक व्यवस्था उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापनामुळे राज्याला बळकटी : आपत्ती येऊ नये, हीच आपली सर्वांची इच्छा असते, पण आपत्ती आलीच तर तिच्याशी सक्षमपणे लढण्यासाठी, तिला सामोरी जाण्यासाठी आपली व्यवस्था पूर्णपणे सज्ज आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, आपत्कालीन केंद्राच्या उभारणीत ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे. त्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. याचबरोबर, हे आपत्ती व्यवस्थापन अत्यंत आधुनिक आणि सुसज्ज व्यवस्था उभी केली आहे. अशा आपत्ती व्यवस्थापनाच्या संस्थात्मक बळकटीकरणात महाराष्ट्र अग्रेसर आहे. तसेच या व्यवस्थापनामुळे राज्याला बळकटी मिळेल, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा :
- ठरलं तर मग! लाडक्या बहिणीचा एप्रिलचा हप्ता कधी येणार, 'या' तारखेला जमा होणार खात्यात पैसे
- राज्याचं नवं वाळू धोरण जाहीर, घरकुलांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू मिळणार; राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत विविध निर्णयांना मंजुरी
- दीनानाथ रुग्णालयातील प्रकरणानंतर पुणे महापालिकेकडून शहरातील ८५० खासगी रुग्णालयांना नोटीस