ETV Bharat / state

बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले विरुद्ध निवडणूक विभागाने परळीत केला गुन्हा दाखल - RANJIT KASLE

बीडमध्ये निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने केला होता. त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी पोलीस ठाणे इन्सेटमध्ये रणजीत कासले
परळी पोलीस ठाणे इन्सेटमध्ये रणजीत कासले (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 19, 2025 at 8:27 PM IST

1 Min Read

बीड - गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमातून बेताल वक्तव्ये करणारा बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने परळी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने तसंच ईव्हीएम मशीनच्या छेडछाड बाबतचे संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या अनुषंगाने आता निवडणूक विभागाने त्याच्या विरुद्ध परळी येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, परळी येथील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अण्णा वंजारे यांनी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी भारताचे निवडणूक आयोग व शासनाची निराधार व बेताल वक्तव्य करून बदनामी केली. लोकसेवक असताना जाणिवपूर्वक भारताचे सार्वभौमत्ता व सुरक्षा धोक्यात येईल अशी खोटी वक्तव्ये केली. तसेच बँकेच्या खात्यावर दिनांक 21/11/2024 रोजी 10 लाख रुपये आले आहेत. सदरचे पैसे है परळी विधानसभा निवडणुक प्रक्रियेतील EVM मशीन पासून दूर राहणे व EVM मशीनमध्ये जी काही छेडछाड होईल त्यासाठी गप्प बसायचे व सहन करायंच, असे वक्तव्य केले. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेविषयी व निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती विषयी नागरिकात संभ्रम निर्माण होऊ शकतो. निवडणूक आयोगाचे व राज्य सरकारचे लौकीकास जनमानसात बाधा होईल अशा उद्देशाने वक्तव्य केले आहे. वास्तविक पाहता अतिशय काटेकोरपणाने निवडणूक प्रक्रिया पार पडलेली असताना विविध समाज माध्यमांमधून सातत्याने ईव्हीएम छेडछाड व हे सरकार या इव्हिएम छेडछाडीतूनच आलेले आहे. अशा पद्धतीची विधाने करून संभ्रम निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. या आशयाच्या फिर्यादीवरून आरोपी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याच्याविरुद्ध गुरनं- 84/2025 कलम 175, 336 (4), 353 (1) (ख), 198, 356(2),197(1)(D), BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, पोलीस.उप नि.राठोड हे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.