ETV Bharat / state

नंदुरबारमधील मंदिरांमध्ये प्रवेशासाठी 'ड्रेस कोड' लागू होणार; महाराष्ट्र न्यास परिषदेत सर्वानुमते ठराव

नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Nandurbar
महाराष्ट्र न्यास परिषदेचं नंदुरबारमध्ये आयोजन (ETV Bharat Marathi)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 10, 2025 at 12:56 PM IST

|

Updated : March 10, 2025 at 2:10 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नंदुरबार : मंदिरांचं पावित्र्य टिकून राहावं, याकरिता महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेच्यावतीनं नंदुरबार जिल्ह्यासह धुळ्यातील दोंडाईचा आणि साक्री येथील काही मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू (ड्रेस कोड) करण्याबाबत चर्चा करण्याकरिता बैठक बोलविण्यात आली होती. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील श्री दंडपाणेश्वर मंदिरात महाराष्ट्र मंदिर महासंघ, दंडपाणेश्वर देवस्थान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

तालुका स्तरावर बैठकांचं आयोजन : या परिषदेमध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या सहाही तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील साक्री आणि दोडांईचा परिसरातील मंदिरांचे पुजारी, विश्वस्त, अर्चक उपस्थित होते. तीन सत्रात या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात मुख्य म्हणजे मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करावा या विषयावर चर्चा झाली आणि उपस्थितांचे मत जाणून घेण्यात आलं. तसंच, या परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांमध्ये येत्या काही दिवसांतच वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आता तालुका स्तरावर बैठकांचं आयोजन केलं जाणार आहे.

प्रशांत कुलकर्णी (ETV Bharat Marathi)

वस्त्रसंहितेचा ठराव सर्वानुमते मंजूर : नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील मंदिर विश्वस्त, पुजारी व अर्चक या परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, महाराष्ट्र न्यास परिषदेचे प्रशांत कुलकर्णी यांनी या ठरावाबाबत उपस्थितांचं म्हणणं ऐकून मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू करणं गरजेचं आहे, यावर मत जाणून घेतलं असता उपस्थतांनी एकमतानं होकार देऊन पाठिंबा दिला आहे. तसंच, नंदुरबार जिल्ह्यासह लगतचा साखरी तालुका व दोंडाईचा येथील मंदिर विश्वस्तांनी व पुजाऱ्यांनी या ठरावाला पाठिंबा दिला असून लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आलंय.

हेही वाचा-

  1. शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चांवर रवींद्र धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "मी काँग्रेसमध्येच..."
  2. "धंगेकर संपलेला नाही, कसब्यात अजूनही 'हू इज धंगेकर' सुरूच"; पाहा व्हिडिओ
  3. चर्चा अखेर खरी ठरली! काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आज शिवसेनेत करणार पक्षप्रवेश
Last Updated : March 10, 2025 at 2:10 PM IST