धुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जागतिक उत्सव म्हणून जगातल्या 152 देशात साजरी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हा संघटक शंकर खरात यांच्यामार्फत 'जिथं खरी गरज आहे, तिथं पैशाचा योग्य वापर करून मदत करावी या हेतूनं धुळे शहरातील बालमंडळ इथं नवजात शिशू आणि अबला महिला, वृद्ध यांना कपडे, मिठाई, दूध पावडर, साडी देऊन अनोखी डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आलीय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नवजात शिशूला मदतीचा हात : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जागतिक उत्सव म्हणून 152 देशांत साजरी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हा संघटक शंकर खरात यांच्या मार्फत 'जिथं खरी गरज आहे, तिथं पैशाचा योग्य वापर करून मदत करावी', या हेतूनं धुळे शहरातील बालमंडळ इथं नवजात शिशू आणि अबला महिला, वृद्ध यांच्या सोबत कपडे, मिठाई, दूध पावडरचे डबे, साडी देऊन अनोखी डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
मुलानं मांडली वडिलांपुढं संकल्पना : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हा संघटक शंकर खरात यांच्या लहान मुलानं धुळे शहरातील शिशुगृहात नवजात मुलांना आपल्याकडून काहीतरी मदत द्यावी, अशी संकल्पना आपल्या वडिलांपुढं ठेवली. त्या चिमुकल्यांची संकल्पना लक्षात घेत शंकर खरात यांनी धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नवजात शिशूंना कपडे, मिठाई दिली. यासह त्यांनी त्यांची सेवा करणाऱ्या महिलांना साड्या देऊन त्यांचा सन्मान यावेळी केला. या कार्यामुळं संपूर्ण शहरात त्यांच्या चिमुकल्याचे आणि शंकर खरात यांचे कौतुक केलं जातंय. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, सुरेश लोंढे, नयनाताई दामोदर, सरोज कदम, प्रशांत वाघ, संजय अहिरे, सिद्धार्थ वाघ, बॉबी नागमल, गणेश जगदेव, बबलू मोरे, सचिन खरात, अक्षय भारस्के, भैय्या धिवरे, मयुरेश निकम यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा :