ETV Bharat / state

दिशा सालियनच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? पोस्टमार्टम रिपोर्टमधून माहिती आली समोर - DISHA SALIAN DEATH NEWS

दिशा सालियानचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. त्यामध्ये दिशाच्या मृतदेहावर जखमा असल्याचं नमूद करण्यात आल्यानं या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

disha salian death news
दिशा सालियनचा मृत्यू (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 26, 2025 at 11:00 PM IST

1 Min Read

मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिशा सालियानच्या मृत्यूवरून मोठा गदारोळ झाल्यानंतर महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन खाली पडल्यानं डोक्याला झालेल्या गंभीर जखमांमुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे.

दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. तिनं आत्महत्या केली होती, असा पोलिसांनी दावा केला होता. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना या सर्व घडामोडी घडल्यानं त्या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशातच दिशाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला. त्यामध्ये दिशाच्या मृतदेहावर जखमा असल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

दिशाच्या मृत्युप्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणीदेखील केली आहे. दिशाचा मृत्यू 8 जूनला झाला असताना पोस्टमार्टम 11 जूनला दुपारी साडेचार वाजता करण्यात आलं होतं. पोस्टमार्टमला झालेल्या विलंबावरुन आक्षेप घेण्यात आले आहेत. मालवणी येथील इमारतीमधून पडल्यानं तिचा मृत्यू झाला होता. तर पोस्टमार्टम बोरीवली येथील रुग्णालयात झाले होते. इमारतीपासून 25 फूट अंतरावर तिचा मृतदेह कसा पडला? असा प्रश्न तिच्या वडिलांनी उपस्थित केला होता. तिचे कपडेदेखील गायब करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.

पोस्टमार्टम अहवालात काय म्हटलं? दिशाच्या पोस्ट मार्टम अहवालात तिचा मृत्यू डोक्याला झालेल्या गंभीर जखमेमुळे झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दिशाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. तिच्या हातावर, पायावर आणि छातीजवळ जखमा झाल्याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. दिशाच्या नाकातोंडातून रक्त आले होते, असे नमूद करण्यात आलं आहे. या अहवालात तिच्यावर कोणतेही लैंगिक अत्याचार झाले नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा-

  1. दिशा सालियनच्या वडिलांची पोलिसांत तक्रार; आदित्य ठाकरेंसह परमबीर सिंग यांच्यावर आरोप
  2. ...तर त्यांना फासावर लटकवलं पाहिजे, मंत्री संजय शिरसाट भडकले
  3. "दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका सांगण्यासाठी उद्धव ठाकरेंचे दोन फोन"; नारायण राणेंचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.