ETV Bharat / state

चंद्रपुरात राज्यात सर्वाधिक डायलिसिस करण्याचा विक्रम ; रुग्णांना मिळते मोफत सुविधा, विस्तारित कक्षाचं उद्घाटन - CHANDRAPUR RECORD HIGHEST DIALYSIS

चंद्रपूर जिल्ह्यातील किडनीच्या आजारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री अशोक उईके यांनी डायलिसिस विस्तारित कक्षाचं उद्घाटन केलं.

Chandrapur Record Highest Dialysis
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 11, 2025 at 9:59 AM IST

3 Min Read

चंद्रपूर : आजच्या काळात किडनीच्या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी रुग्णाला डायलिसिस सारख्या आधुनिक आरोग्य सेवेची आवश्यकता भासते. मात्र या सुविधेअभावी चंद्रपुरातील सर्वसामान्य रुग्णांना नागपुरातील शासकीय रुग्णालयात जावं लागायचं. खासगी रुग्णालयात ही सुविधा घेणं आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असायचं. अशातच 2024 मध्ये ही अद्यावत सुविधा चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी स्वतंत्र डायलिसिस विभाग सुरू करण्यात आला. याचा मोठा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांना झाला. 2024-25 या वर्षी राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेत सर्वाधिक डायलिसिस करण्याचा विक्रम हा चंद्रपूरच्या नावे झाला. मात्र, तरीही डायलिसिस करण्याच्या प्रक्रियेत अनेक रुग्णांना विलंब लागते. आता या डायलिसिस विभागाचा विस्तार करण्यात आला. या विस्तारित कक्षाचं उद्घाटन आदिवासी विकास मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आलं. विशेष म्हणजे ही सुविधा पुर्णतः मोफत आहे, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी ही सुविधा मैलाचा दगड ठरली आहे.

चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात डायलिसिस विभाग : किडनी ही रक्तातील अशुद्धता आणि त्यातील अपायकारक तत्वांना बाहेर काढण्याचं महत्वाचं कार्य करते. मात्र, किडनीचा आजार जडल्यास या कार्याला मोठी बाधा निर्माण होते. त्यामुळे या अशुद्ध रक्तातून मानवी जीवास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी डायलिसिस या आरोग्य सेवेची मदत घेतली जाते. या माध्यमातून कृत्रिम पद्धतीनं मानवी शरीरातील रक्त शुद्ध केल्या जाते. रुग्णांची गंभीरता आणि आवश्यकता बघून त्यांना वेळोवेळी डायलिसिस देणं आवश्यक असते. ही प्रक्रिया अत्यंत महागडी असते. शिवाय चंद्रपुरात या आरोग्य सुविधेचा अभाव होता. खासगी रुग्णालयात देखील अपवाद वगळता ही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नागपुरात जावं लागायचं. ही प्रक्रिया अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ होती. शिवाय यात रुग्णाला जोखीम देखील मोठी होती. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना चंद्रपुरात ही सुविधा उपलब्ध व्हावी ही मागणी जोर धरत होती. ही निकडीची गरज लक्षात घेता 2024 मध्ये चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात डायलिसिस विभाग उभारण्यात आला. या विभागाअंतर्गत एक स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला. या कक्षात 9 स्वतंत्र मशीन कार्यान्वित करण्यात आल्या.

तेलंगाणा राज्यातील रुग्णांनाही झाला लाभ : केवळ चंद्रपूरच नव्हे, तर गडचिरोली तसेच लागून असलेल्या तेलंगाणा राज्यातील रुग्णांना देखील याची मोठी सुविधा झाली. डायलिसिस विभागात दर महिन्याला जवळपास 550 ते 600 डायलिसिस केले जातात. त्यानुसार राज्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेच्या पाहणीत सर्वाधिक डायलिसिस करण्यात चंद्रपूर जिल्हा रुग्णालयानं प्रथम क्रमांक पटकावला. 2024-25 या वर्षात तब्बल 6368 डायलिसिस करण्यात आले. मात्र ही सुविधा सुरू असताना 20 ते 25 रुग्णांना या याची प्रतीक्षा करावी लागत होती. ही असुविधा बघता या अद्यावत आरोग्य यंत्रणेत आणखी भर टाकण्याची मागणी समोर आली. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी पाठपुरावा केला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनीही आपल्या राजकीय आयुधांचा उपयोग करून विस्तारित कक्षाची मागणी मंजूर करून घेतली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या निधीची उपलब्धता करण्यात आली आहे. पूर्वी इथं 9 डायलिसिस मशीन कार्यान्वित होत्या, त्यात आता आणखी 4 मशीनची भर पडली आहे. जवळपास 50 टक्के ही आरोग्य यंत्रणा विस्तारित झाली असून ही मोठी उपलब्धता मानली जात आहे. नुकतेच या विस्तारित कक्षाचं उद्घाटन पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, मा सां कन्नमवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, ताडोबा प्रकल्पाचे उपसंचालक आनंद रेड्डी, अति. जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर सोनारकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके आदी उपस्थित होते.

या अद्यावत सुविधेचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा - शल्य चिकित्सक : सामान्य रुग्णालयात सद्यस्थितीत 13 डायलिसिस मशीनद्वारे सेवा देण्यात येत असून प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग कर्मचारी इथं रुग्णांची सेवा बजावत आहेत. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. डायलिसिस विभाग हा जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी मैलाचा दगड ठरत आहे. यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळतील. तरी जास्तीत जास्त डायलिसिस रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. आदिवासी नृत्य करून भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा विजयी जल्लोष
  2. 'महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांची दिशाभूल; मदतीची घोषणा निव्वळ फसवणूक'
  3. अवनीच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबातील सदस्याला नोकरी - डॉ. अशोक उईके

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.