ETV Bharat / state

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीला क्षयरोगाचा विळखा? पालिकेच्या उपाययोजना काय?

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीला अनेक रोगांचा विळखा पडलाय. त्यामध्ये क्षयरोगाचे प्रमाण यात सर्वाधिक आहे.

DHARAVI TUBERCULOSIS PATIENTS
धारावीला क्षयरोगाचा विळखा? (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 22, 2025 at 10:55 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : सध्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा चांगलाच गाजला. दुसरीकडं मात्र, याच धाराविला क्षयरोगानं विळखा घातल्याचं आता एका सर्वे मधून समोर आलय. मुंबईतील क्षयरोगाचे प्रमाण पाहता मुंबईत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आधीच चार धोकादायक वार्ड निश्चित केले होते. या चार धोकादायक वार्डमध्ये प्रामुख्यानं एम पूर्व म्हणजेच गोवंडी, पी उत्तर म्हणजेच मालाड, एन वॉर्ड म्हणजेच घाटकोपर, जी उत्तर प्रभाग म्हणजेच दादर माटुंगा आणि यात धारावीचा बहुतांश परिसर येतो. या परिसरात मुंबईतील सर्वाधिक रुग्ण आढळून येतात.

रूग्ण शोधण्याासाठी मोहिम : देशातील क्षयरोग निर्मूलनासाठी केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ असा १०० दिवसांचा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. मुंबईत केंद्र सरकार व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन यांच्या माध्यमातून क्षयरोग तपासणी मोहीम डिसेंबर २०२४ पासून राबवली जात आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मुंबईतील क्षय रोगांच्या रुग्णांचा शोध घेतला जातो. पालिकेच्या माहितीनुसार, "मुंबईतील सर्व प्रभागात म्हणजे २४ वार्डमध्ये ही मोहीम राबवली जात असून, यात क्षयरोग रुग्ण शोधणे, त्यांचे समुपदेशन करणे आणि त्यांचा औषधोपचार या सर्व बाबी येतात."

दरवर्षी आढळतात साठ हजार रूग्ण : मुंबईत दरवर्षी साठ हजार रुपये अधिक नवे क्षयरोगाचे रुग्ण आढळतात. त्याचबरोबर चार ते पाच हजार औषध प्रतिरोधक क्षयरोगाची नवी प्रकरणे नोंदवली जातात. धारावीत लोक औषध घेण्यास टाळाटाळ करत असल्यानं आणि योग्य ती खबरदारी घेत नसल्यानं क्षयरोगाचे प्रमाण अधिक असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. "धारावीत दाटीवाटीची वस्ती आहे. इथं लोक नीट वैद्यकीय उपचार घेत नाहीत. सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपचार केले जातात. मात्र, झोपडपट्टीतील लोकांना आपण आपली ओळख उघड होण्याची भीती वाटत असल्यानं लोक उपचार घेण्यास टाळाटाळ करतात," अशी माहिती पालिका प्रशासनानं धारावीत क्षयरोग वाढण्याचे कारण काय? या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

धारावीत मोठया प्रमाणात रूग्ण : "धारावीत केवळ क्षयरोगच नाही तर, इतर अनेक आजारांचे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. अपुरे पोषणमूल्य असलेला आहार इथल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. त्यामुळं धारावी परिसरातील रहिवासी संसर्गजन्य आजारांना लगेच बळी पडतात. इथल्या रहिवाशांमध्ये त्वचेच्या आजाराशी संबंधित अनेक रुग्ण दिसून येतात. घरात हवा खेळती नसणं, स्वच्छता नसणं, अपुरा आहार यामुळं अस आजार इथे दिसून येतात," अशी माहिती महापालिकेनं दिली.

मोहीम अधिक सक्रिय करणार : "ही मोहीम आपण अधिक सक्रिय करत असून, संपूर्ण मुंबईमध्ये जनजागृती आणि रुग्णांचा शोध घेतला जात आहे. आता या रुग्णांवर उपचार देखील केले जात असून, रुग्ण बरे होण्याचा सक्सेस रेट देखील वाढला आहे. मुंबईचा क्षयरोग रुग्ण बरे होण्याचा सक्सेस रेट हा आता ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपायुक्त डॉक्टर दक्षा शहा यांनी दिली.

हेही वाचा :

  1. तंबाखूच नाही तर घरातील या 6 वस्तुंनी देखील होऊ शकतो कर्करोग!
  2. तुम्हाला देखील अनावश्यक भीती आणि शारीरिक थकवा जाणवतो का? असू शकतो ‘हा’ आजार
  3. तुम्हाला सतत आजारी असल्यासारखं वाटतं का? तो आजार नसून आहे ‘ही’ समस्या