नागपूर : राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकी पूर्वीच हार स्वीकार केली आहे. पराभवाच्या मानसिकतेतून ते बोलत आहेत.
राहुल गांधींनी मतदारांचा अपमान केला : "मी नेहमी असं म्हणतो की, जोपर्यंत राहुल गांधी जमिनीवर उतरणार नाहीत, तथ्य समजून घेणार नाहीत, जोपर्यंत स्वतःच खोटं बोलत राहतील, स्वतःलाच खोटे आश्वासन देत आणि दिलासा देत राहतील तोपर्यंत त्यांचा पक्ष निवडणुका जिंकू शकत नाही. त्यांना जागावं लागेल आणि यथार्थ समजावा लागेल, नाहीतर ते अशी बेताल वक्तव्यं करत राहतील, नेहमी खोटं बोलत राहतील" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राहुल गांधी मतदारांचा अपमान करत आहेत. राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या मतदारांचाही अपमान केलाय, मी त्याचा निषेध करतो. या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांना ही माहीत नसतं की काय बोलत आहेत, ऐकणारा देखील ते समजत नाही.
रोज खोटं बोलण्याची राहुल गांधींना सवय : महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या अचानक कशी वाढली? यावर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, रोज-रोज खोटं बोललं की लोकांना तेचं खरं वाटू लागतं असं राहुल गांधींंना वाटत असल्यामुळं सातत्यानं त्याच त्या गोष्टी ते बोलत असतात. हा आरोप त्यांनी यापूर्वी देखील केलेला होता. त्याला निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये किती मतदार वाढले होते? या निवडणुकीत किती मतदार वाढले याचं उत्तर दिलं आहे. तरी देखील रोज खोटं बोलायचं ही सवयचं राहुल गांधी यांना लागलेली आहे. ते स्वतःच्या मनाला समजत आहे, जोपर्यंत ते सत्य स्वीकारणार नाहीत आणि जागे होऊन जमिनीवर येऊन काम करणार नाही तोवर त्यांच्या पक्षाला भवितव्य नाही. राहुल गांधी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम करत आहेत.
खरंच ठाकरे बंधूंना उत्सुकता आहे का? : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येत असल्याची चर्चा ही गेल्या काही दिवसांपासून रोज रंगलेली आहे. या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, "दोन्ही भावांच्या युतीवर रोज काय बोलणार. मी कालच बोललो, जेवढी उत्सुकता दोन भावांना नसेल तेवढी मीडियाला आहे. तुम्ही रोज पतंग उडून राहिलेत, त्यावर उत्तर देत बसणार नाही."
हेही वाचा -