ETV Bharat / state

पुण्यातील मंगेशकर रुग्णालयानं २७ कोटींहून अधिकचा कर थकवला; रुग्णालयावर कारवाई करा, युवक काँग्रेसची मागणी - DEENANATH MANGESHKAR HOSPITAL

गरोदर महिलेच्या मृत्यूप्रकरणी वादात सापडलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं २७ कोटींहून अधिकचा मालमत्ता कर थकवलाय. त्यामुळं आता महापालिका रुग्णालयावर काय करवाई करणार, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Yuvak Congress
युवक काँग्रेस आणि खासदार सुप्रिया सुळे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 7, 2025 at 6:35 PM IST

2 Min Read

पुणे : दहा लाख रुपयांच्या अनामत रकमेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे या गरोदर महिलेला उपचार नाकारल्यानं आणि वेळेत उपचार न मिळाल्यानं गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आता नवीन वादात सापडलं आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने २०१९ पासून पुणे महापालिकेचा तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकत कर थकवला असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर रुग्णालयाविरोधात प्रचंड प्रमाणात रोष वाढला आहे.

रुग्णालयावर तत्काळ दंडात्मक कारवाई करा : मिळकत कर थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तत्काळ दंडात्मक कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं पुणे महानगरपालिका कर आकारणी आणि संकलन विभागाच्या उपआयुक्त यांना निवेदन देण्यात आलं. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील, विद्यार्थी काँग्रेस पुणे सरचिटणीस कृष्णा साठे, दीपक चौगुले, ज्ञानेश्वर जाधव, कुलदीप नाईकनवरे, देवेंद्र खाटीर, बाबा मिसाळ, सुनील कुसाळकर, ऋषिकेश आंधळे हे उपस्थित होते.

आंदोलन करण्याचा सुप्रिया सुळेंचा इशारा : खासदार सुप्रिया सुळे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत मिळकत कर प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलं आहेत. पुढील दोन दिवसात तत्काळ कायदेशीर बाबी तपासून रुग्णालयावर कारवाई करा अन्यथा गुरुवारपासून मी स्वतः युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलनास बसणार असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी महापालिकेला दिला. सरकार या रुग्णालयास पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सर्वसामान्य पुणेकरांना एक न्याय आणि धनदांडग्यांना वेगळा न्याय, अशी भूमिका घेता येणार नाही असंही सुळे यांनी म्हटलं.

रुग्णालयावर कारवाई का केली नाही? : पैश्यासाठी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या, एका गरोदर महिलेचा जीव घेऊन नवजात दोन जुळ्या मुलांना आईच्या मायेला पोरकं करणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं २०१९ सालापासून २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपये इतका मिळकत कर भरला नाही. गेल्या ६ वर्षांपासून जर रुग्णालय कर भरत नसेल तर आजपर्यंत महापालिकेने या रुग्णालयावर कारवाई का केली नाही? सर्वसामान्य नागरिकांनी मिळकत कर भरला नाही तर घराला टाळे ठोकण्याची, शास्ती आणि जप्तीची तसंच दंड आकारण्याची कारवाई करण्यात महापालिका जी तत्परता दाखवते तीच तत्परता दाखवून, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. आमच्या निवेदनाची दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिकेला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. कायदेशीर बाबी तपासून दोन दिवसात उत्तर न दिल्यास व रुग्णालयावर कारवाई न केल्यास गुरुवारपासून सुप्रिया सुळे या स्वतः आमच्यासोबत आंदोलनास बसणार आहेत. असं यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप, चिल्लर फेकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन
  2. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची होणार चौकशी; दोषी आढळल्यास होणार कारवाई, आरोग्यमंत्र्यांचा इशारा
  3. "'इमर्जन्सी'मध्ये रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही", दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.