ETV Bharat / state

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरची खंडणी प्रकरणातून निर्दोष सुटका - IQBAL KASKAR

वर्ष 2015 मध्ये कासकरनं ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे 30 लाख रुपये आणि चार सदनिकांच्या खंडणीची मागणी केली होती.

मुंबई सत्र न्यायालय
mumbai sessions court (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 26, 2025 at 1:04 PM IST

1 Min Read

मुंबई- कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) स्थापन मुंबईतील विशेष न्यायालयाने खंडणीच्या एका प्रकरणातून निर्दोष सुटका केलीय.

नेमकं प्रकरण काय आहे? - वर्ष 2015 मध्ये कासकरनं ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे 30 लाख रुपये आणि चार सदनिकांच्या खंडणीची मागणी केली होती. कासकरनं या प्रकरणातील एका सह-आरोपीच्या नावानं एक सदनिका नोंदणीकृतही केली. कासकर आणि या आरोपीविरुद्ध ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. नंतर याप्रकरणी कासकरसह अन्य आरोपींवर मोक्कांतर्गत खटला चालवण्यात आला. मात्र या सहआरोपीचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा शकीलला फरारी आरोपी दाखवण्यात आलेलं आहे.

कोर्टाचा निकाल काय? - खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपांसह इक्बाल कासकरवर मोक्कांतर्गत खटला चालविण्यात आला. विशेष मोक्का न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी या खटल्याचा निर्णय देताना कासकरवर ठेवण्यात आलेल्या सर्व आरोपांतून त्याची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. लावलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पोलीस सबळ पुरावे दाखल करू न शकल्याचं कोर्टानं आपल्या निकालात स्पष्ट केलंय.

इक्बाल कासकरचा मुक्काम मात्र तुरुंगातच राहणार - इक्बाल कासकर हा सध्या ठाणे तुरुंगात असून, त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दाखल खटला न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे खंडणीच्या या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली असली तर त्याचा मुक्काम कारागृहातच राहणार आहे. यापूर्वीही कासकरची दक्षिण मुंबईतील सारा-सहारा मार्केट प्रकरणातून निर्दोष सुटका केली होती.

हेही वाचाः

गुन्हेगारांची गाळण, वाहतूक शिस्तीत आणि मंदिर परिसरातील चोरीला आळा; शिर्डीतील 'या' पोलीस अधिकाऱ्यांची तुफान कामगिरी

हाजिर हो! मानहानी खटल्यात राहुल गांधींना पुणे न्यायालयाचं समन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.