ETV Bharat / state

मुंब्रा स्थानकाजवळचे धोक्याचे वळण, यामुळेच लाईफलाईन बनली डेथलाईन - DANGEROUS CUVATURE

मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेच्या वळणावर शेवटी घात झालाच. आज चार जणांचा जीव रेल्वे अपघातात झाला. आतातरी यावर काही उपाय केला जाईल का, असा प्रश्न उपस्थित होतोय.

मुंब्रा स्थानकाजवळील वळण
मुंब्रा स्थानकाजवळील वळण (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 9, 2025 at 8:06 PM IST

Updated : June 9, 2025 at 8:51 PM IST

4 Min Read

मुंबई - उपनगरीय रेल्वे अर्थात लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन. दररोज सुमारे ८० लाख प्रवासी उपनगरीय रेल्वेतून प्रवास करतात. प्रवास करतात म्हणण्यापेक्षा आपले आणि कुटुंबीयांचे पोट भरण्यासाठी या रेल्वेचा आधार घेतात. ही लोकल ट्रेन प्रत्येक मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहे. मात्र, दोन दिवस सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर कामावर परतणाऱ्या मुंबईकरांसाठी सोमवार आठवड्याचा पहिलाच दिवस घातवार ठरला आण‍ि मुंबईकरांची लाईफलाईन ही डेथलाईन बनली. मुंब्रा रेल्‍वे स्थानकाजवळ विरुद्ध दिशेने धावणाऱ्या दोन फास्ट लोकलला फुटबोर्डवर लटकलेले प्रवासी घासले गेले आण‍ि खाली पडले. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ९ प्रवासी जखमी आहेत. या घटनेला कारणीभूत ठरले ते मुंब्रा स्थानकाच्या एका टोकला दिवा जंक्शन स्थानकाच्या दिशेने असलेले धोकादायक वळण. हे वळण धोकादायक आहे, या ठिकाणी रेल्वे एका बाजूला झुकत असल्याच्या तक्रारी काही प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी केल्या होत्या. मात्र, त्यावर उपाययोजना न झाल्यामुळे ही घटना घडली, अशी टीका लाेकप्रतिनिधी प्रवाशांकडून रेल्वेवर करण्यात येत आहे.

कळवा, मुंब्रा आण‍ि दिवा या स्थानकादरम्यान रेल्वे मार्गावर तीव्र वळणे आहेत. त्यामुळे रेल्वेचे डबे एका बाजूला झुकत असल्याची तक्रार मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आण‍ि रेल्वचे नियमित प्रवासी आनंदा पाटील यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. कळवा स्थानकाच्या पुढे पारसिक बोगद्याच्या अलीकडे आणि पुढे, तसेच मुंब्रा स्थानकाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अप आणि डाऊन मार्गावरील वळणांवर, तसंच मुंब्रा स्थानक सोडल्यानंतर दिवा स्थानकाच्या दिशेने दोन्ही अप आणि डाऊन वळणांवरून प्रवासी गाड्या धावत असताना डबे झुकत आहेत. गर्दीच्या वेळेत गाड्यांमध्ये होणाऱ्या अतिरिक्त प्रवासी भारामुळे डब्यात प्रचंड दाटी निर्माण होते. परिणामी, गाडी झुकल्याने प्रवाशांच्या रेट्यामुळे दरवाज्याजवळ डब्याच्या आतील बाजूस उभ्या असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन ते डब्याबाहेर फेकले जात आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी होत असून काही जणांचा मृत्यू देखील होत आहे. अशा घटना वारंवार घडत असून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली होती. सकाळी आण‍ि संध्याकाळी गर्दीच्या वेळी म्हणजे पीक अवरमध्ये प्रवासी या वळणाजवळ पूर्ण ताकद लावून तोल सांभाळतात. फेब्रुवारी महिन्यात २० तारखेला पाटील यांनी तक्रार केली होती.

मुंब्रा स्थानकाजवळील वळण पाहणी करताना अधिकारी (ETV Bharat Reporter)

रेल्वे सर्वस्वी जबाबदार - मनसे नेते अविनाश जाधव - या स्पॉटला अशी घटना घडू शकते. तो कर्व्ह आण‍ि त्यापुढे असलेला सिग्नल यातून मोठा अपघात घडू शकतो, याची कल्पना तीन महिन्यांपूर्वी दिली होती. त्याची दखल घेऊन कारवाई केली असती, तर आजचा अपघात झाला नसता. या घटनेला सर्वस्वी रेल्वे जबाबदार आहे, अशी टीका मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. तर, हे वळण आहे, तेथे जरासा धक्का लागला की माणूस खाली पडतो. हा दिवा ते मुंब्रा पट्टा डेंजर झोन आहे. या ठिकाणी महिन्याकाठी ४-५ अपघात होतात. हे वळण धोकादायक आहे. ट्रेन त्या वळणावरुन जाताना झटका बसतो आण‍ि प्रवासी एका बाजूला झुकतात. त्यामुळे अपघात होतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

रेल्वेने काय उत्तर दिले? - पाटील यांच्या तक्रारीनंतर रेल्वेने उत्तर दिले होते. कळवा ते दिवा या मार्गावरील बराच भाग हा कर्व्हेचरवर आहे, अर्थात वळणांचा आहे. त्या ठिकाणी तांत्रिक उपाययोजना केली आहे. वळणावर गाडी सुरक्ष‍ित धावली पाहिजे, यासाठी ट्रॅकच्या बाहेरील बाजूच्या रुळाची उंची जास्त ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गाडीचे संतुलन कायम राहते. याबाबत तांत्रिक सर्वेक्षणदेखील करण्यात आलेले आहे, असे उत्तर पाटील यांना रेल्वेकडून देण्यात आले होते.

"मुंब्रा–कळवा–दिवा मार्गावर वारंवार होणाऱ्या रेल्वे अपघातांचे मूळ कारण म्हणजे वळणांवरून धावणाऱ्या गाड्यांतील अनियंत्रित प्रवासी गर्दी आणि डब्यांचे झुकणे. मी यासंदर्भात २० फेब्रुवारी २०२५ रोजी रेल्वे मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार सुद्धा दाखल केली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने केवळ तांत्रिक कारणांची कबुली दिली असून प्रत्यक्ष सुरक्षाव्यवस्थेबाबत कोणतीही ठोस कृती केली नाही. प्रवाशांच्या जीवाशी असा खेळ थांबायला हवा. वाढत्या गर्दीकडे दुर्लक्ष न करता अतिरिक्त फेऱ्या, डबे वाढवणे आणि दिवा, मुंब्रा स्थानकाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षेसाठी गार्ड रेलिंगसारखी संरचना उभारणे हे अत्यावश्यक आहे." - आनंदा पाटील, उपाध्यक्ष, मराठी एकीकरण समिती – महाराष्ट्र राज्य

अपघातानंतर रेल्वे अधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी - मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातानंतर दुपारी रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे ट्रॅकच्या वळणाबाबत तक्रारी आल्यानंतर अधिकाऱ्यांनी अपघातस्थळी तपासणी केली. फास्ट अप आण‍ि डाऊन दोन्ही मार्गांमध्ये किती अंतर आहे, याची मोजणी अधिकाऱ्यांनी केली. आम्ही अपघात जिथे घडला त्या ठिकाणी तपासणी करीत आहोत. संपूर्ण विभागाच्या विविध टीम तपास करीत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

खतरनाक टर्न, रेल्वेने उत्तर द्यावे - जितेंद्र आव्हाड - मृत्यूची काही किंमत आहे का? हे मृत्यू टाळता कसे येतील, हे महत्त्वाचे आहे. दिव्यावरुन मुंब्य्राला येताना खतरनाक टर्न आहे. तेथे रेल्वेचा रेक झुकताना दिसतो. या वळणाकडे रेल्वेने दुर्लक्ष केले. याबाबत रेल्वेने उत्तर द्यायला हवे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

धीम्या गतीचा मार्ग जलदगतीसाठी वापरला - दिवा आण‍ि ठाणे या मार्गावर पाचवी आण‍ि सहावी मार्गिका फेब्रुवारी २०२२ मध्ये कार्यान्वित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे लोकार्पण केले होते. वर्ष २००८ मध्ये या मार्गिकेचं काम सुरू झालं होतं. हे काम २०१५ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र, त्यास विविध कारणांनी तब्बल ७ वर्षांचा विलंब झाला. यात महत्त्वाची बाब म्हणजे, पाचवी आण‍ि सहावी नवी मार्गिका धीम्या लोकासाठी वापरण्यात आली. तर, आधीपासून असलेली तिसरी आण‍ि चौथी मार्ग‍िका जलद गाड्यांसाठी वापरण्यात येत आहे. हा मार्ग आधी धीम्या गाड्यांसाठी वापरण्यात येत होता. तर, जलद लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्या या पारसिक बोगद्यातून जात होत्या. या गाड्या कळवा आण‍ि मुंब्रा स्थानकातून जात नव्हत्या. सोमवारी जो अपघात झाला, तो जलद मार्ग‍िकांवर झाला. हा मार्ग आधी धीम्या गतीच्या लोकलसाठी वापरला जात असल्यामुळे त्यावेळी गाड्यांचा वेग मुंब्रा स्थानकावर थांबण्यासाठी अतिशय कमी करण्यात येत होता. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्या नव्हत्या. मात्र, याच मार्गाचा वापर जलद गाड्यांसाठी होत आहे. त्यामुळे वळणावर गाड्या झुकत असल्याची तक्रार करण्यात आली होती.

१ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील आकडेवारी

  • १५ महिन्यांत मुंबई लोकलने ३००० हून अधिक प्रवाशांचे प्राण घेतले; ट्रेसपासिंग’मुळे सर्वाधिक मृत्यू
  • रेल्वे रुळ ओलांडताना १५ महिन्यांत १४२० जणांचा मृत्यू
  • मुंबई उपनगरीय रेल्वेची धावपळ ठरतेय मृत्यूची रेषा; एकूण ३०१८ बळी, ३३१९ जखमी

कुठे आहेत अपघाताचे हॉट स्पॉट? - ठाणे, कुर्ला, कल्याण आणि वाशी ‘हॉटस्पॉट’ ठरत आहेत. रेल्वे रुळ ओलांडण्याच्या घटनांमध्ये मध्य रेल्वे विभाग सर्वाधिक धोकादायक ठरत असून, इथे तब्बल ८४९ मृत्यू झाले आहेत. यामध्ये ठाणे (१९५ मृत्यू) हे स्थानक सर्वात वर असून, त्याखालोखाल कुर्ला (१३८), कल्याण (१२८), वाशी (१०२), डोंबिवली (६८) अशी क्रमवारी आहे. दुसरीकडे, पश्चिम रेल्वे विभागात ५७१ मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये बोरीवली (१८०), वसई (१५१) आणि पालघर (९३) या स्थानकांचा समावेश आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि अंधेरी स्थानकांवरही काहीशा मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत.

Last Updated : June 9, 2025 at 8:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.