ETV Bharat / state

शालार्थ आयडी घोटाळा : शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, वरिष्ठ लिपीक सूरज नाईक चौकशीसाठी सायबर पोलिसांच्या ताब्यात - CYBER CELL DETAINS DEPUTY DIRETOR

नागपूर शिक्षण विभागातील घोटाळ्यात धक्कादायक घडामोडी घडत आहेत. शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर सेलनं शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि वरिष्ठ लिपीक सूरज नाईकला ताब्यात घेतलं.

Cyber Cell Detains Deputy Diretor
संग्रहित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 18, 2025 at 9:57 AM IST

Updated : April 18, 2025 at 3:04 PM IST

1 Min Read

नागपूर : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात सर्वात मोठी घडामोडी घडलेली आहे. नागपूर सायबर सेलनं विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि वरिष्ठ लिपीक सूरज नाईक यांना ताब्यात घेतलं आहे. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मार्च महिन्यात नागपूरच्या सायबर पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल झालेला होता. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी उल्हास नरड आणि सूरज नाईक यांना ताब्यात घेण्यात आलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

CYBER CELL DETAINS DEPUTY DIRETOR
पोलीस ठाणे (Reporter)

बोगस मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणात न्यायालयीन कोठडी : बोगस मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणात दोघंही आरोपी कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. या दोघांना प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्यात आलं आहे. सायबर पोलीस दोन दिवस चौकशी करणार आहेत. त्यामुळे याप्रकरणात अजून काही नवीन खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शालार्थ आयडी घोटाळा : शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, वरिष्ठ लिपीक सूरज नाईक चौकशीसाठी सायबर पोलिसांच्या ताब्यात (Reporter)

पासवर्डचा गैरवापर कुणी केला : विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरडच्या सांगण्यावरून विभागीय उपसंचालक कार्यालय कर्मचारी रवींद्र पाटील यानं पासवर्डचा गैरवापर करून शालार्थ आयडी तयार केल्याच्या आशयाची तक्रार 12 मार्चला नागपूर सायबर पोलिसात दाखल करण्यात आली. मात्र, शालार्थ आयडी निर्माण करण्याचा अधिकार हा उल्हास नरड यांनाच असताना त्यांच्या माहिती शिवाय पासवर्डचा गैरवापर कसा झाला, या दिशेनं पोलीस सविस्तर चौकशी करणार आहेत.

CYBER CELL DETAINS DEPUTY DIRETOR
पोलीस उपायुक्त लोहित मतानी (Reporter)

बोगस शिक्षक घोटाळ्यात अटक आरोपींची संख्या सहा वर : बनावट शिक्षक कागपत्र घोटाळा प्रकरणात ही मोठी अपडेट पुढं आली आहे. शिक्षण घोटाळा प्रकरणात पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. महेंद्र भाऊराव म्हैसकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. महेंद्र म्हैसकर हा गोंदिया जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शिक्षक भरती संदर्भात बनवाट कागपत्र तयार करून त्यांचा प्रस्ताव तयार करण्याचं काम महेंद्र म्हैसकर हा करत असल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. यापूर्वी विभागीय उपसंचालक उल्हास नरडसह एकूण पाच जणांना अटक केली असून यामध्ये आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे. महेश म्हैसकर सोबत आणखी जिल्हा परिषद शिक्षण विभाग भंडाऱ्याचे अधिकरी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. बोगस शिक्षक घोटाळा प्रकरण; सरकारी तिजोरीला लावला कोट्यवधींचा चुना, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
  2. नागपुरात साकारणार स्पोर्ट्स हब, देवेंद्र फडणवीसांनी केली बांधकामाची पाहणी; म्हणाले, 'ग्रीन बिल्डींग म्हणून...'

Last Updated : April 18, 2025 at 3:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.