ETV Bharat / state

अशोक चव्हाण काँग्रेसचे महाराष्ट्र केसरी पण आता जत्रेत कुस्त्या खेळतात; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जय जवान जय किसान तिरंगा महारॅली काढण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली.

HARSHWARDHAN SAPKAL
हर्षवर्धन सपकाळ (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2025 at 9:02 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नांदेड : नुकत्याच झालेल्या पावसाने मुंबई तुंबली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भ्रष्टाचार तुंबला असल्याचा आरोप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस यांनी आपले लाडके अधिकारी मुंबई महापालिकेत पाठवले आणि महापालिकेचा 90 हजार कोटी रुपयांच्या डिपॉझिटचा भ्रष्टाचार केला. आता मुंबई महापालिकेवर कर्जाचा डोंगर आहे असंही सपकाळ म्हणाले.


अशोक चव्हाण महाराष्ट्र केसरी होते : माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण हे हिंदकेसरी होते तर काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण हे महाराष्ट्र केसरी होते. पक्षाने त्यांना अनेक पदं दिली. पण महाराष्ट्र केसरी असलेले हे पैलवान आता भाजपामध्ये जाऊन यात्रेतील कुस्त्या खेळत असल्याची शेलकी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ (ETV Bharat Reporter)



बाळा दराडेला काय म्हणाले? : विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी अपशब्द काढणारे काँग्रेसचे राहुल गांधी जेव्हा नाशिकमध्ये येतील तेव्हा त्यांच्या तोंडाला काळे फसू असं वक्तव्य, बाळा दराडे यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं आहे. ते म्हणाले, "राहुल गांधी यांना हात लावायला कोणता माई का लाल पैदा झाला नाही" अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अरुण शवरी नावाचे एक मंत्री होते ते त्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये होते. जे राहुल गांधी बोलले तेच त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये प्रकाशित केलं तर जगामध्ये त्या पुस्तकाला खूप मागणी आहे.



तिरंगा महारॅली : आज काँग्रेस पक्षाच्यावतीनं जय जवान जय किसान तिरंगा महारॅली काढण्यात आली होती. रॅली नवीन मोंढा येथून निघून गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली होती. या रॅलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्रॅक्टर पूर्ण रॅलीत चालवून नांदेडकरांचं लक्ष वेधलं. या रॅलीत खासदार रवींद्र चव्हाण, खासदार विठ्ठल कागणे, तसंच आजी-माजी आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या रॅलीमध्ये शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर आणून सहभाग देखील नोंदवला होता.


हेही वाचा -

  1. वेळप्रसंगी रक्तही सांडू, पण...; अमित शाहांच्या गुजराती भाषणावरून विरोधकांचा हल्लाबोल
  2. "पहिल्याच पावसात मुंबईकरांचे हजारो कोटी पाण्यात गेले, केवळ श्रेयवादासाठी मेट्रोचं उद्घाटन", संजय राऊतांचा हल्लाबोल
  3. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांशी एकनिष्ठ मातब्बर घराणं सोडणार साथ, 'सरकार' आता भाजपात