ETV Bharat / state

काँग्रेसकडून बाबासाहेबांना त्रास देण्याचे काम, मोदी आल्यानंतर खऱ्या अर्थाने संविधान दिनाला सुरुवात, एकनाथ शिंदे कडाडले - EKNATH SHINDE ON RAHUL GANDHI

परदेशातील विद्यापीठातील बाबासाहेबांचे पुतळे उभे केलेत. पण काही जण उगाच हातात लाल डायरी घेऊन संविधान धोक्यात आहे म्हणतायेत, असा टोला राहुल गांधींना एकनाथ शिंदेंनी लगावला.

Deputy Chief Minister of the state Eknath Shinde
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 14, 2025 at 4:34 PM IST

2 Min Read

मुंबई– आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आहे. त्याबद्दल मी त्यांना कोटी कोटी प्रणाम आणि वंदन करतो. समाजातील, तळागळातील, वंचित लोकांना बाबासाहेबांनी मुख्य प्रवाहात आणले. त्यांना समता, बंधुता आणि समानतेचा हक्क, अधिकार दिला. समतेचा संदेश देणारे बाबासाहेब यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय मिळाला पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिले. त्या संविधानामुळे आज देशातील लोकशाही टिकून आहे. बाबासाहेब हे महान व्यक्ती क्रांतिसूर्य, प्रज्ञासूर्य ज्ञानी होते. त्यांच्या गौरवापीत्यर्थ परदेशातील विद्यापीठातील बाबासाहेबांचे पुतळे उभे केलेत. पण काहीजण उगाच हातात लाल डायरी घेऊन संविधान धोक्यात आहे म्हणतायेत, असा टोला राहुल गांधींचे नाव न घेता एकनाथ शिंदेंनी लगावला. एकनाथ शिंदेंनी आज माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

काँग्रेसने बाबासाहेबांना त्रास दिला...: दरम्यान, पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, काँग्रेसने बाबासाहेबांना त्रास दिला. बाबासाहेबांचा पराभवही केला. परंतु खऱ्या अर्थाने 2014 साली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी झाले आणि खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा होऊ लागला. तोपर्यंत संविधान.. संविधान... संविधान म्हणून फक्त लोक गळा काढत होते. पण काही करीत नव्हते. महाराष्ट्र सरकारसुद्धा तालुका तालुकास्तरावर संविधान भवन उभं करतंय आणि बाबासाहेबांच्या आठवणी जतन करण्याचं काम करतोय. म्हणून हिंदू मिलमध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेबांचे स्मारक उभं राहत आहे. जगाला हेवा वाटावा असं ते स्मारक त्या ठिकाणी उभे राहतंय हीदेखील तमाम देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

भाषणापेक्षा माझ्यासाठी बाबासाहेबांचे दर्शन महत्त्वाचे : आज जयंतीनिमित्त लोकांमध्ये उत्साह अन् जल्लोष आहे. बाबासाहेब खरं म्हणजे संविधानाचे शिल्पकार आहेतच. पण ते माणुसकीचे देखील शिल्पकार आहेत. माणुसकी काय असते. माणसाने कसं जगावं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, न्याय मिळवा हे ब्रीदवाक्य बाबासाहेबांचे होते. आमचे सरकारदेखील बाबासाहेबांच्या विचारावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतंय आणि म्हणून बाबासाहेबांची घटना सर्वसामान्यांना न्याय देणारी घटना आहे. सामान्य कुटुंबातला व्यक्ती या देशाचे प्रधानमंत्री झाले. एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि एक आमची दलित आदिवासी भगिनी या देशाची राष्ट्रपती झाली. ही सगळी जादू, किमया बाबासाहेबांच्या घटनेची, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची आहे. या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे. याचा आनंद प्रत्येकाला आहे. तुम्हाला भाषण करण्यास दिले नाही म्हणून तुम्ही नाराज आहात का, असं एकनाथ शिंदेंना विचारले असता, त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला महत्त्वाचं आहे, असं शिंदे म्हणालेत.

हेही वाचाः

सत्तेसाठी आम्हाला अमित शाहांचे पाय चाटण्याची गरज नाही, संजय राऊतांचं मंत्री चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

"छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अमित शाहांचं ५०० पानांचं पुस्तक वाचून तुम्हाला चक्कर येईल", चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.