ETV Bharat / state

भिसे कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; दोन्ही मुलींचा उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येणार - DEENANATH MANGESHKAR HOSPITAL CASE

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी आज ईश्वरी भिसे कुटुंबीयांची भेट घेतली.

CM Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 5, 2025 at 6:04 PM IST

Updated : April 5, 2025 at 11:19 PM IST

2 Min Read

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं (Deenanath Mangeshkar Hospital) उपचार नाकारल्यानं ईश्वरी सुशांत भिसे या गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

राज्य सरकारकडं अहवाल सादर करणार : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ईश्वरी भिसेसोबत घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं स्थापित केलेली समिती आज पुण्यात दाखल झाली आहे. लवकरच समिती आपला अहवाल राज्य सरकारकडं सादर करेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. धर्मदाय आयुक्तालयाशी संबंधित रुग्णालयासाठी राज्य सरकार एक नवी एसओपी अर्थात स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस तयार करणार आहे. त्याचबरोबर आगामी अधिवेशनात धर्मदाय कायद्यात बदल करून धर्मदाय आयुक्तांच्या अधिकारात देखील वाढ करणार आहे, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)

सुविधा असल्या तरी चूक ही चूकच : धर्मदाय रुग्णालयातील बेड संख्या आणि त्या ठिकाणी रुग्णांना उपचार मिळावे यासाठी लवकरच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आणि धर्मदाय आयुक्त यांच्याशी संबंधित हॉस्पिटल हे ऑनलाइन जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त करण्यास टाळाटाळ केली. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे दिवंगत लतादीदी आणि मंगेशकर कुटुंबीयांनी खूप कष्टातून उभा केलं आहे. त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यात येतात. मात्र, त्यांच्याकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला चूकच म्हणावं लागेल अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

स्वतःच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांवर जर कोणी चिल्लर फेकत असेल किंवा आक्रमक आंदोलन करत असेल तर ते चुकीचं आहे. मग जर ते भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्या असल्या तरी त्यांचं कृत्य चुकीचं आहे, असं म्हणत फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरच आगपाखड केली. दरम्यान माध्यमांशी बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पीडित ईश्वरी भिसेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराविषयी माहिती घेतली. त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन फडणवीस यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिलं.

दोन्ही मुलींचा उपचारांचा मुख्यमंत्री सहायता निधीतून!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रकरणात संपूर्ण चौकशी होऊन कारवाई होईल. पण, आज त्या कुटुंबापुढे जन्माला आलेल्या दोन अपत्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. मुदतपूर्व प्रसुतीमुळे ही दोन्ही अपत्य आज ‘एनआयसीयू’मध्ये आहेत. त्यांना आणखी काही काळ त्यांना तेथे उपचार घ्यावे लागणार आहेत. त्याचा खर्चसुद्धा अधिक आहे. त्यामुळे त्या दोन्ही मुलींचा उपचारांचा खर्च हा मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश मी दिले आहेत.

हेह वाचा -

  1. "'इमर्जन्सी'मध्ये रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही", दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय
  2. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश; जिल्हाधिकारी डूडी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
  3. "धर्मादाय परवाना रद्द करुन, जमीन ताब्यात घ्या" विविध संघटनांकडून दीनानाथ रुग्णालयाबाहेर आंदोलन

Last Updated : April 5, 2025 at 11:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.