गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते चॉपर घेऊन थेट अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवंडे येथे गेले. तेथील पोलिसांच्या जनजागरण मेळाव्याला संबोधित करून त्यांनी थेट जनतेत जाऊन माता, भगिणींशी संवाद साधला. कवंडे गावातील नागरिकांशी प्रत्यक्षपणे लोकांसोबत खाली बसून त्यांच्यातलेच एक होऊन फडणवीस लोकांशी बोलले. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनां बाबत माहिती देताना कुणी कुणी लाभ घेतात. कुठल्या योजना मिळाल्या आणि या भागातील नागरिकांना काय हवे अशी थेट विचारणा केली. त्यासोबतच शाळकरी मुलींशी देखील त्यांनी संवाद साधला. विशेष या भागात तलाठी, ग्रामसेवकही ढुंकून पाहत नाही, अश्या ठिकाणी थेट जनतेत जाऊन मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून समस्या जाणून घेतल्याने नागरिकांच्यात मोठा आनंद झाल्याचे दिसून आले.
कवंडे हा गाव माओवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. छत्तीसगड राज्यातून माओवादी याच गावातून महाराष्ट्रात प्रवेश करतात. नुकतेच गेल्या 9 मार्च रोजी गडचिरोली पोलिसांनी याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन उभारले. या भागात 10 ते 15 किलोमीटर अंतरावर नेलगुंडा, पेनगुंडा आणि कवंडे असे तीन पोलीस स्टेशन उभारून माओवाद्यांचे प्रवेश द्वार बंद केले आहे. आज या भागात अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांची भेट घेऊन त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात आले. यावेळी पोलिसांच्या जनजागरण मेळाव्यात त्यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आलं. त्यांनी भागातील जनतेशी देखील आपुलकीने संवाद साधला आहे.
विशेष म्हणजे कालच लगतच्या छत्तीसगड राज्यात माओवाद्यांचा केंद्रीय समितीचा सदस्य सुधाकर याला ठार मारण्यात आले. या घटनेला 24 तास पूर्ण झाले नाही, तोच याच अतिसंवेदनशील भाग असलेल्या कवंडे गावात मुख्यमंत्री पोहोचले.
हेही वाचा...