ETV Bharat / state

व्यावसायिकाला रात्रभर डांबून घेतली लाच; सीबीआयनं जीएसटी अधीक्षकासह तिघांना ठोकल्या बेड्या - CBI Arrested CGST Superintendent

CBI Arrested CGST Superintendent : व्यावसायिकाकडून 20 लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागानं ( CBI ) सीजीएसटीच्या अधीक्षकासह तिघांना अटक केली. या व्यावसायिकाला रात्रभर डांबून ठेऊन त्याच्याकडून लाच घेतल्याचा आरोप तक्रारदारानं केला.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2024, 12:39 PM IST

CBI Arrested CGST Superintendent
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat)

मुंबई CBI Arrested CGST Superintendent : सीबीआयनं सीजीएसटीच्या अधीक्षकासह तीन आरोपींना अटक केल्यानं मोठी खळबळ उडाली. यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दोन खासगी व्यक्तींना सापळा रचून 20 लाख रुपये घेतल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. हवालाद्वारे कथितपणे 33 लाख रुपये लाचेची रक्कम दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

20 लाखाची लाच घेताना पकडलं : केंद्रीय अन्वेषण विभागानं (सीबीआय) सापळा कारवाईदरम्यान, सीजीएसटी, मुंबई पश्चिम आयुक्तालयाचे अधीक्षक आणि दोन खासगी व्यक्तींसह तीन आरोपींना अटक केली आहे. एक खासगी चार्टर्ड अकाउंटंटच्या माध्यमातून लाचेची मागणी करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी 60 लाखापैकी 20 लाख रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. लाचेच्या एकूण रकमेपैकी 30 लाख रुपयांची रक्कम यापूर्वी हवालाद्वारे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सीबीआयनं दाखल केला गुन्हा : सीबीआय ने CGST, मुंबईच्या 6 अधिकाऱ्यांसह 8 आरोपींविरुद्ध प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. एक अतिरिक्त आयुक्त, एक सहआयुक्त, 4 अधीक्षक आणि 2 खासगी व्यक्तीमध्ये एक चार्टर्ड अकाउंट असून यांच्याविरुद्ध लाचखोरीच्या आरोपांवरुन गुन्हा नोंदवला. तक्रारदारानं सांताक्रुज इथल्या जीएसटी कार्यालयाला 4 सप्टेंबर रोजी भेट दिली. तेव्हा त्यांना संपूर्ण रात्र कार्यालयात कोंडून ठेवण्यात आलं. त्यांना 5 सप्टेंबर रोजी सुमारे 18 तासानंतर सोडण्यात आलं, असा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला. कैदेत असताना सीजीएसटीच्या अधीक्षकानं त्याला अटक न करण्यासाठी 80 लाख रुपयाची लाच मागितली. तडजोडीनंतर ही लाच कमी करुन 60 लाख इतकी ठरवण्यात आली. त्या अधीक्षकाचे इतर तीन सहकारी देखील तक्रारकर्त्यांवर दबाव आणण्यासाठी वारंवार बळाचा वापर करुन शिवीगाळ करत होते, असा आरोपही तक्रारदारानं केला आहे.

रात्रभर ठेवलं कार्यालयात डांबून : अधिकाऱ्यांच्या कैदेत असताना तक्रारदाराला त्याच्या चुलत भावाला कॉल करण्यासाठी भाग पाडलं. नंतर CGST अधिकाऱ्यांनी तक्रारकर्त्याला अटक न करण्यासाठी आणि CGST द्वारे चालू असलेल्या तपासात त्याची बाजू घेण्यासाठी त्याच्या चुलत भावाला बोलावलं. तक्रारदाराच्या चुलत भावानं नंतर आरोपी असलेल्या सीएशी संपर्क साधला. सीए आणि इतर आरोपी खासगी व्यक्ती यांनी मध्यरात्री CGST कार्यालयात जाऊन CGST अधिकाऱ्यांशी लाचेबाबत बोलणी केली. 60 लाख रुपयांच्या वाटाघाटीतील लाचेपैकी 30 लाख रुपये तक्रारदाराच्या चुलत भावानं अंगडियामार्फत दिल्याचा आरोप आहे. त्यानंतरच तक्रारदाराला दुसऱ्या दिवशी सीजीएसटी कार्यालयातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. या प्रकरणी मुंबई आणि आरोपींच्या कार्यालय आणि निवासी जागेवर 9 ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली. विविध कागदपत्रं जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. CBI Bribe Arrest : सीजीएसटीच्या सहाय्यक आयुक्तांसह निरीक्षकाला लाच घेताना CBI कडून अटक
  2. CGST Superintendent Arrested:5 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या सीजीएसटी अधीक्षकाला अटक; सीबीआयची कारवाई
  3. Mumbai Crime : सीबीआयच्या जाळ्यात अडकला CGST विभागातील लाचखोर अधीक्षक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.