सातारा - सातारा शहरात सध्या चोरीच्या घटना वाढत असून चोरट्यांनी बंद घरे टार्गेट केली आहेत. दौलतनगरमधील अस्च एक बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह ५ लाख रूपये किंमतीचे १३ तोळ्याचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी एका महिला वकिलाच्या घरात झाली असून शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ॲड. पूनम चंद्रशेखर इनामदार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
महिला वकिलाचं बंद घर फोडलं : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ॲड. पूनम इनामदार (रा. दौलतनगर, सातारा) यांच्या बंद घराच्या दरवाजाचे सेपटी लोंक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील रोख रकमेसह किचन कट्ट्याखाली ठेवलेल्या स्टिलच्या डब्यातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना ५ जून ते १० जून या दरम्यान घडली आहे. इनामदार कुटूंब परगावी गेल्यामुळं घर बंद होतं. ही संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली आहे इनामदार कुटुंबीय घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
चोरीला गेलेल्या ऐवजात मौल्यवान वस्तू : घरफोडीत चोरट्यांनी लंपास केलेल्या ऐवजात ५० हजार रूपये किंमतीची सोन्याची पाच ग्रॅमची अंगठी, ३० हजार रूपये किंमतीची ६ ग्रॅमची कर्णफुले, १ लाख रूपये किंमतीचे ३० ग्रॅमचे कंगण, ४० हजार रूपये किंमतीचे १५ ग्रॅमचे पदक, १ लाख रूपये किंमतीच्या ४ तोळ्याच्या ९ अंगठ्या, ५० हजाराचे २ तोळे वजनाचे कानातील जोड, चांदीचे ब्रेसलेट, दोन महागडी घड्याळे. २०० रूपयांची नाणी, तसंच २५ हजार रूपयांची रोकड, असा एकूण ४ लाख ७७ हजार रूपयांच्या ऐवजाचा समावेश आहे.
ठसे तज्ज्ञांची घटनास्थळी भेट : पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण केलं. त्यांनी चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले. बंद घरे फोडणाऱ्या रेकॉर्डवरील चोरट्यांची माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान, फिर्यादी ॲड. पूनम इनामदार यांनी सरकारी वकील म्हणूनही काम केलं आहे. सध्या त्या विधी सेवा प्राधिकरणाचं कामही पाहतात. त्यामुळं पोलिसांनी घरफोडीच्या तपासाला गती दिली आहे.
हेही वाचा -