ETV Bharat / state

ब्रिटिशकालीन प्रभादेवी पूल 25 तारखेपासून होणार बंद, पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल - BRITISH ERA PRABHADEVI BRIDGE

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएद्वारे एक नवीन प्रभादेवी उड्डाणपूल बांधला जाणार आहे. नव्या पुलाच्या कामासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटलंय.

British era Prabhadevi Bridge to be closed from 25th april 2025
ब्रिटिशकालीन प्रभादेवी पूल 25 तारखेपासून होणार बंद (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 24, 2025 at 1:02 PM IST

2 Min Read

मुंबई– मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने बुधवारी एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली असून, 25 एप्रिलपासून एलफिन्स्टन पुलावरून वाहतूक बंद करून सदर वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे सांगितले जातेय. पूर्व आणि पश्चिम दिशेने परळ आणि प्रभादेवीला जोडणारा ब्रिटिशकालीन प्रभादेवी पूल पाडण्यात येणार आहे. त्याच्या जागी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएद्वारे एक नवीन प्रभादेवी उड्डाणपूल बांधला जाणार आहे. या नव्या पुलाच्या कामासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटलंय.

उड्डाणपूल शिवडी-वरळी उन्नत मार्गाला जोडणार : एमएमआरडीएद्वारे एक नवीन प्रभादेवी उड्डाणपूल बांधला जाणार असून, नवा उड्डाणपूल शिवडी-वरळी उन्नत मार्गाला जोडणार आहे. या बांधकामामुळे प्रभादेवी पुलावरून वाहनांच्या वाहतुकीवर काही काळाकरिता बंदी घालण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं म्हटलंय. पोलिसांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, 25 एप्रिल रोजी रात्री 9 वाजल्यापासून हा पूल वाहनांसाठी बंद केला जाणार असून, पूर्व ते पश्चिम आणि पश्चिम ते पूर्व दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन मार्ग निश्चित करण्यात आलेत.

परळला जाण्यासाठी करी रोड ब्रिजचा वापर करता येणार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी टिळक पुलाचा वापर करावा लागणार असून, परळ पूर्वेकडून प्रभादेवी/लोअर परळला जाण्यासाठी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत करी रोड ब्रिजवरून प्रवास करता येणार आहे. भायखळा पूर्वेकडून वरळी कोस्टल रोड/सी लिंकला जाण्यासाठी चिंचपोकळी ब्रिज वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय. दादर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी वाहन चालकांना टिळक पुलाचा वापर करता येणार आहे. तर प्रभादेवी किंवा लोअर परळ पश्चिमेकडून टाटा हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल किंवा परळला जाण्यासाठी करी रोड ब्रिजचा वापर करता येणार आहे. सदर मार्ग दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत खुला ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. कोस्टल रोड, सी लिंक, वरळी, प्रभादेवी ते परळ आणि भायखळा पूर्वेला जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी मुंबईकरांना केलंय.

पोलिसांकडून अनेक मार्गांवर पार्किंगला पूर्णपणे बंदी : पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भारत माता जंक्शनकडे वाहतूक एकाच दिशेने वाहतूक सुरू राहणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजल्यापासून वाहतूक दुसऱ्या दिशेने धावेल. मात्र, रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत या मार्गावर दोन्ही दिशांना वाहतूक सामान्य राहील, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. वाहतूक पोलिसांनी अनेक मार्गांवर पार्किंगला पूर्णपणे बंदी घातली असून, यात आर्थर रोड नाका ते धन मिल नाका, प्रभादेवी जंक्शन ते राखांगी जंक्शन, भारत माता जंक्शन ते शिंगटे मास्तर चौक, संत जगनाडे चौक ते आर्थर रोड चौक, भवानी शंकर रोडवरील हनुमान मंदिर ते कबुतरखाना ते गोपीनाथ चव्हाण चौक, एस. बोले मार्गात हनुमान मंदिर ते पोर्तुगीज चर्चपर्यंतचा मार्ग समाविष्ट आहे.

दोन्ही दिशांना पार्किंग पूर्णपणे प्रतिबंधित : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर दोन्ही दिशांना पार्किंग पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आली असून, सेनापती बापट मार्गावरील वडनाका ते फितवाला जंक्शनपर्यंत दोन्ही मार्ग कार्यरत राहतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर, दुसरीकडे स्थानिक रहिवाशांच्या सोयीसाठी एमएमआरडीएने दोन आपत्कालीन रुग्णवाहिकांची व्यवस्था केली असून, प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळ पश्चिमेला सार्वजनिक पादचारी पुलाजवळ एक रुग्णवाहिका उभी असेल. दुसरी रुग्णवाहिका परळ रेल्वे स्थानकाजवळ पूर्वेला उभी केली जाणार आहे. याशिवाय व्हीलचेअरची सुविधा देखील दिली जाईल, असे एमएमआरडीएने म्हटलंय.

हेही वाचाः

राजकोट किल्ल्यावरील पुतळा उभारणार, छत्रपतीचा पुतळा ताशी 200 किमी वाऱ्याचा वेग भेदणार; ऑस्ट्रेलियामध्ये चाचणी संपन्न

नवीन संचमान्यतेविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची उच्च न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.