नागपूर-प्रेयसीच्या मृत्यूनंतर व्यथित झालेल्या तरुणानं थेट तिच्या सरणावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी अंत्यसंस्काराला आलेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी चितेवर उडी मारणाऱ्या तरुणाला जबर मारहाण केली. मारहाणीनंतर बेशुद्ध झालेल्या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमभंगानं झाल्यानं निराश झालेल्या तरुणीनं आत्महत्येचं पाऊल उचललं. तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतानाचं अचानकपणे तरुण त्या ठिकाणी आला. त्यानं सरणावर उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिथे हजर असलेल्या लोकांनी त्या तरुणाला चोप दिला. तरुणाला लोकांच्या मदतीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत.
- प्रेमभंगाच्या वेदनेत विव्हळलेल्या तरुणानं थेट प्रेयसीच्या चितेवर उडी मारून स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांनी प्रसंगावधान राखत तरुणाला थांबवलं. मात्र, या घटनेमुळे त्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी तरुणाला चोप दिल्यानं तो गंभीर जखमी झाला.
नैराश्यातून तरुणीची आत्महत्या- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या तरुणाचे आणि तरुणीचे प्रेमसंबंध होते. मात्र, अलीकडे त्यांच्या नात्यात काही कारणानं दुरावा निर्माण झाल्यानंतर तिनं आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस ठाणे येथे भादंवि कलम 194 (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर त्या तरुणीचा मृतदेह हा पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
सरणावर उडी मारण्याचा प्रयत्न- कामठी येथील कन्हान नदीच्या शांती घाटावर अंत्यसंस्कार सुरू असताना तरुण दारूच्या नशेत घटनास्थळी आला. तो मृतदेहावर उडी मारण्याचा प्रयत्न करीत होता. तिथे उपस्थित लोकांनी त्याला रोखून जबर मारहाण केली. यावेळी झालेल्या जबर मारहाणीत तो बेशुद्ध झाला. त्यानंतर वडील राजेंद्र मेश्राम आणि मोठा भाऊ पवन मेश्राम यांनी पोलिसांच्या मदतीनं त्याला रुग्णालयात दाखल केलं.
पोलीस करणार कारवाई-घटनेनंतर नवीन कामठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश आंधळे आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त विशाल शिरसागर यांनी घटनास्थळी पाहणी केली. तरुण शुद्धीवर आल्यावर पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तरुणाच्या नातेवाईकांनी मृत तरुणीच्या कुटुंबीयांवर मारहाणीचा आरोप केला आहे. पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
ईटीव्ही भारतचे आवाहन: आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. परिस्थिती काहीही असो, माणसानं नेहमीच धैर्यानं अडचणींचा सामना केला पाहिजे. जर तुम्हाला परिस्थिती हाताळण्यात काही अडचण येत असेल, तर तुम्ही ताबडतोब आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइनवर कॉल करू शकता: १८००२३३३३३०. लक्षात ठेवा, जीवनाचं मूल्य कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आहे. जर तुम्हाला ताण येत असेल तर कुटुंब आणि मित्रांशी बोला,
हेही वाचा-