पुणे : इंदापूरमध्ये राहणाऱ्या एका ७० वर्षीय आजोबांच्या अन्ननलिकेमध्ये (bone stuck in Esophagus) मटणाचं हाड अडकलं होतं. यामुळं आजोबांची प्रकृती फारच खराब झाली होती. पुण्यातील ससून रुग्णालयातील शल्यविषारदांच्या पथकानं ‘एंडोस्कोपी’द्वारे यशस्वीपणे (successful surgery on 70 years old man) हाड बाहेर काढून त्यांना जीवनदान दिलंय.
नेमकं काय घडलं? : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील ७० वर्षीय आजोबांनी २४ फेब्रुवारी रोजी एका विवाह सोहळ्यात मांसाहार असलेलं जेवण करताना चुकून हाडही गिळलं. ते हाड अन्ननलिकेत आडवं होऊन अडकलं. अडकलेल्या हाडामुळं अन्ननलिकेत छिद्र झालं. यामुळं आजोबांची प्रकृती खूपच खराब झाली होती. पुढील दोन दिवसांत त्यांना वेगवेगळ्या स्थानिक रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं. मात्र, योग्य ते उपचार न झाल्यानं शेवटी त्यांना ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करुन अडकलेलं हाड बाहेर काढण्यात आलं.
जेवण करताना मोबाईल पाहणे, गप्पा मारणे अशा कारणांनी विचलित होऊ नये. काही अन्नपदार्थ अन्ननलिकेत अडकू शकतात. अन्नपदार्थ ३२ वेळा चावून खावेत-डॉ. पद्मसेन रनबागळे
कासावीस रुग्णाची डॉक्टरांनी केली सुटका : ससून रुग्णालयात रुग्णाला दाखल केल्यानंतर तत्काळ त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी सीटी स्कॅनद्वारे हाडाची अचूक स्थिती शोधून काढली. हाड हे आडवं अडकलं होतं. त्याचं आकारमान ५.३ बाय ३ सेमी इतकं होतं. रुग्णाचं वय लक्षात घेता शस्त्रक्रिया करणं धोकादायक ठरलं असतं म्हणून एंडोस्कोपीद्वारे हाड काढलं. २७ फेब्रुवारी रोजी शल्यविषारद (सर्जरी) विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पद्मसेन रनबागळे यांच्या नेतृत्वाखाली एंडोस्कोपीद्वारे यशस्वीपणे हाड बाहेर काढून त्यांना जीवनदान देण्यात आलं. तसंच अन्ननलिकेचे छिद्र बुजवण्यासाठी स्टेंटही टाकण्यात आलं आहे.
हेही वाचा -