ETV Bharat / state

आयपीएस झालेल्या बिरदेवला पाहताच बहिणीच्या अश्रूंचा बांध फुटला, बहिणीच्या गावात बिरदेव डोणेंचं असं झालं स्वागत... - BIRDEV DONE INTERVIEW

मेंढपाळ करणाऱ्या बिरदेव डोणे यांनी यूपीएससीमध्ये यश मिळविलं. पाहा त्यांची मुलाखत

birdev done interview
बिरदेवला पाहताच बहिणीच्या अश्रूंचा बांध फुटला (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 24, 2025 at 9:05 PM IST

Updated : April 25, 2025 at 12:45 AM IST

1 Min Read

कोल्हापूर- भारतीय सैन्यदलात सेवेत जाऊन देशाची सेवा करण्याचं वडिलांचं स्वप्न होतं. मात्र वडिलोपार्जित मेंढपाळ व्यवसाय, पाचवीला पुजलेल्या गरीबीमुळे वडिलांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. सिद्धाप्पा डोणे यांनी मुलांना चांगलं शिक्षण दिलं. यातूनच मोठ्या मुलानं वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. तो भारतीय लष्कर सेवेत दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक बनण्याचं स्वप्न पाहिलेल्या मोठ्या भावांनं कुटुंबाला आणि यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या लहान भावाला हातभार लागावा म्हणून भारतीय सैन्यदलात सेवेची नोकरी पत्करली.

मंगळवारी निकाल लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 551 वी रँक मिळवून आयपीएस पदाला गवसणी घातलेल्या बिरदेव डोणे यांची ही कहाणी कुणालाही थक्क करणारी वाटावी अशीच आहे. निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच बहिणीच्या घरी चिकोडी तालुक्यातील झोर- कुडळी इथं आल्यानंतर अधिकारी झालेल्या भावाला पाहून बहीण हर्षदा पुजारी यांच्या अश्रूंचा बांध फुटला. भावाच्या गळ्यात पडून बहीण ढसाढसा रडली. भावांनं मिळवलेले यश बघून आलेल्या आनंदाश्रूंनी सगळेजण गहिवरले.

आयपीएस झालेल्या बिरदेवला पाहताच बहिणीच्या अश्रूंचा बांध फुटला, बहिणीच्या गावात बिरदेव डोणेंचं असं झालं स्वागत... (Reporter)

बिरदेव डोणे आणि त्यांची बहीण हर्षदा पुजारी यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनं बातचीत केली. यमगे ता. कागल येथील सिद्धाप्पा डोणे यांना दोन मुलं आणि एक मुलगी असताना घरची हलाखीची परिस्थिती आहे. परिस्थितीतून अभ्यासात सातत्य आणि कष्टाच्या बळावर डोणे कुटुंबातील बिरदेव डोणे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा तिसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण होत यश अक्षरशः खेचून आणलं. यापूर्वी दोन प्रयत्न केले होते. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात सगळे पेपर चांगले गेल्यानं यशाची खात्री असताना धाकधूक कायम होती. माझ्यासोबत अभ्यास केलेले मित्र ईशांत देशमुख यांनी मंगळवारी दुपारच्या वेळी तू आयपीएस झाला आहेस. अशी बातमी दिल्यानंतर माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. काही क्षण माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, अशा भावना यावेळी बिरदेव डोणे यांनी व्यक्त केल्या आहेत. तर लहानपणापासूनच शेळ्या-मेंढ्यांमध्ये वाढलेला असल्याने बेळगावजवळ पाहुण्यांची बकरी घेऊन गेलो होतो. तेव्हाच या आनंदाची बातमी मला समजली. यामुळे कुटुंबीयांनीही पारावरच आनंद साजरा केल्याचं नूतन आयपीएस अधिकारी बिरदेव डोणे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.

Last Updated : April 25, 2025 at 12:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.