अमरावती - शेतकरी आणि दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी माजी मंत्री बच्चू कडूंनी आपल्या मागण्या संदर्भात गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. आपल्या नेत्याच्या आंदोलनाला पाठिंबा देत चांदूरबाजार तालुक्यातील प्रहार कार्यकर्त्यांनी तालुक्यात दोन ठिकाणी आंदोलन केलं. तहसील कार्यालयाच्या परिसरात मुंडन आंदोलन तर पूर्णा प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन केलं.
शेतकरी आणि दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी माजी आमदार बच्चू कडूंनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ, मनरेगाच्या मजुरीत वाढ, सेंद्रिय खतांना अनुदान आणि दूध उत्पादकांना योग्य दर अशा सरकारकडं मागण्या केल्या आहेत. तरी सरकारनं या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सरकारचा निषेध करण्याकरीता प्रहार कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी मुंडन आंदोलन केलं.
अनेक कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी- चांदूर बाजार तहसील कार्यालयाच्या परिसरात प्रहार तालुकाप्रमुख संतोष किटकले यांच्या नेतृत्वात आज शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडन करून तहसीलदार रामदास शेळके यांना निवेदन दिलं. यावेळी दीपक भोंगाडे, शिवाजी बंड, अरुण गोंडीकर, मुजफ्फर हुसेन, सचिन खुळे, प्रदीप बंड, मुन्ना बोंडे, संदीप मोहोड, गजानन ठाकरे, राहुल खापरे, मंगेश चौधरी, विलास शहाणे, सतीश घोम, रोहित मेंढे, गजेंद्र गायकी, संदीप देशमुख, बाळासाहेब वाकोळे, मनीष एकलारे, सागर निंभोरकर, श्रीकांत धोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होते.

विश्रोळी धरणात उतरले कार्यकर्ते- विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पावर मंगेश देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये प्रकल्पाच्या पाण्यामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये भगवंत दामेदर, मोहित देशमुख, आकाश औतकर, मदन बावणे, बबन झटाले ,अनिल निंबोरकर, अमित ठाकूर प्रकाश सह्यांदे ,प्रभुदास शेळके, रामेश्वर नवघरे, स्वराज डरागे, अतुल ठाकरे, अशोक अलोने, यांच्यासह अनेक कार्यकर्ते यामध्ये सहभागी होते. या दोन्ही आंदोलनामध्ये चांदूरबाजार ठाणेदार संतोष टाले आणि ब्राह्मणासाठी ठाणेदार उल्हास राठोड यांनी चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात होता.
- आज (बुधवारी चांदूर बाजार बंद)- बुधवारी चांदुर बाजार शहरातील कृषी केंद्र आणि मेडीकल -वगळता संपूर्ण बाजारपेठ दुपारी 12 ते 2 वाजेपर्यत बंद ठेवणार असल्याचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं.
हेही वाचा-