ETV Bharat / state

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात समाजकंटकाकडून नंग्या तलवारी घेऊन हल्ल्याचा प्रयत्न - BABASAHEB AMBEDKAR JAYANTI

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात समाजकंटकाकडून नंग्या तलवारी हातात घेऊन जमावावर हल्ला करण्याचा प्रयत्न खोणी गावात घडला. त्यामुळे परिसरात दहशत पसरली होती.

खोणी गावातील घटनास्थळावरील लोक
खोणी गावातील घटनास्थळावरील लोक (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 14, 2025 at 5:17 PM IST

1 Min Read

ठाणे - भिवंडी तालुक्यातील खोणी गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात एका समाजकंटकाने जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानं तलवारीने जमावावर हल्ल्याचा प्रयत्न करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी समाजकंटकाच्या विरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवीदास बाळाराम पाटील (२३) असं दहशत पसरवणाऱ्या समाज कंटकाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सालाबादप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजीच्या जयंतीचे औचित्य साधत डेकोरेशन करून संगीत, बँड वाद्याचा कार्यक्रम खोणी गावात आयोजीत केला होता. त्यावेळी कार्यक्रम बघण्यासाठी १०० ते १२० लोकांची गर्दी जमलेली असतानाच आरोपी देविदासने दुचाकीने कार्यक्रमस्थळाच्या जवळून जाताना यांनी रोड बंद केला तो यांच्या बापाचा आहे का?" असे बोलून जातीवाचक शिवीगाळ करून निघून गेला. त्यानंतर पुन्हा घरून हातात दोन तलवारी घेऊन चालत येत तलवारी हवेत फिरवून कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थितांवर तलवारीने हल्ला करून दहशत पसरवली. त्यावेळी उपस्थितांनी सैरावैरा पळत तलवारीचे हल्ले चुकवत घरी जाऊन दरवाजे बंद करीत स्वतःचे प्राण वाचवले. त्यानंतर खोणीतील रहिवासी सागर उत्तम पाटील याने आरोपी देविदासची समजूत काढत त्यास कार्यक्रमाच्या ठिकाणाहून दूर नेले.

या दहशतीच्या प्रकारामुळे गावची शांतता भंग पावल्याने आणि गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने सिद्धार्थ नगर मधील रहिवाशी सुमित गायकवाड आणि नितेश नामदेव तपासे यांच्या साक्षीने भिवंडी मनपाचे सहाय्यक आयुक्त बाळाराम कोंडू जाधव यांच्या फिर्यादीवरून देविदास याच्या विरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या १०९, ३५२, ३५१ (२), अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम,१९८९ चे कलम ३(१)(r),३(१)(s),३(२)(va),३(२),शसस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१),१३५ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डगले यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास डगले करीत आहेत.

हेही वाचा...

  1. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी राष्ट्रपुरुष, त्यांच्या मार्गाने पुढे जाण्याचा संकल्प करू यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  2. महामानवाच्या 134 व्या जयंती निमित्त पवित्र दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायांकडून अभिवादन
  3. शाळेबाहेर बसणारा विद्यार्थी ते 'द सिम्बॉल ऑफ नॉलेज'; जाणून घ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.