ETV Bharat / state

हेल्पलाईनवर फोन करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न; अत्याचार करणारा इंजिनिअर अखेर गजाआड! - CRIME NEWS

एका विकृत ५० वर्षीय शेजाऱ्यानं चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर स्वतः निर्दोष असल्याचा बनाव करत पोलिसांना ११२ हेल्पलाईनवर कॉल करून मुलीच्या पालकांविरोधात खोटी तक्रार दिली.

Engineer who abused little girl finally arrested
अत्याचार करणारा इंजिनिअर अखेर गजाआड! (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 10, 2025 at 2:22 PM IST

Updated : April 10, 2025 at 4:11 PM IST

1 Min Read

ठाणे : स्वतःच्या कुकर्मावर पांघरूण घालण्यासाठी आरोपीनं पोलिसांच्या हेल्पलाईनचा वापर केला. पण, सत्य लपवता येत नाही आणि पाप कुठल्याही मास्कमागे लपून राहत नाही. उल्हासनगरमध्ये एका विकृत ५० वर्षीय शेजाऱ्यानं चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर स्वतः निर्दोष असल्याचा बनाव करत पोलिसांना ११२ हेल्पलाईनवर कॉल करून मुलीच्या पालकांविरोधात खोटी तक्रार दिली. मात्र, पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या तपासात सत्य उघडं पडलं आणि अखेर त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कॉल केला : पोलिसांची हेल्पलाईन नंबर - ११२ ही सेवा नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आली, पण उल्हासनगरमध्ये एका विकृत व्यक्तीनं तीच सेवा आपल्या घृणास्पद गुन्ह्याचं सत्य लपवण्यासाठी वापरली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५० वर्षीय इंजिनिअर आरोपीनं आपल्या शेजारी राहणाऱ्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर ६ एप्रिल रोजी लैंगिक अत्याचार केल्यानंतर, पोलिसांची दिशाभूल करत ११२ नंबरवर कॉल करून तिच्याच पालकांविरोधात खोटी तक्रार दिली. "मुलीला घरच्यांकडून त्रास होतोय. मला तिला दत्तक घ्यायचं आहे" असं भासवत आरोपीनं पोलिसांसमोर सहानुभूतीच वेगळंच चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांना या प्रकरणाचा संशय आल्यानं त्यांनी या घटनेची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांना दिली.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल केलाय : दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पालकांची विचारपूस केली असता, त्यांना ही तक्रार ऐकून धक्काच बसला. त्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी आणि पीडित मुलीच्या घरच्यांनी आपल्या मुलीला विश्वासात घेत तिच्याशी संवाद साधला. त्यानंतर मुलीनं जे सांगितलं ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं त्या चिमुकलीने सांगितलं की तिच्यावर अत्याचार करणारा तोच व्यक्ती आहे, जो तिला दत्तक घ्यायची भाषा करत होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. "वक्फ बोर्ड कायद्याला आमचा विरोध नाही पण..."; 'ईटीव्ही भारत'शी बोलताना अरविंद सावंत यांचं मोठं वक्तव्य
  2. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती
  3. पत्नीचं आजारपण, दोन्ही मुलं मुंबईत अधिकारी; नैराश्यातून निवृत्त मुख्याध्यापकानं उचललं टोकाचं पाऊल

Last Updated : April 10, 2025 at 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.