ETV Bharat / state

अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; विरोधी पक्षनेतेपदाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं... - ANNA BANSODE

आज विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) अण्णा दादू बनसोडे यांची बिनविरोध आणि एकमतानं निवड करण्यात आलीय.

Anna Bansode
अण्णा बनसोडे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 26, 2025 at 1:17 PM IST

1 Min Read

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (बुधवार) शेवटचा दिवस आहे. आज अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. आजच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. हे अधिवेशन अनेक कारणांमुळं गाजलं. सामान्य लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा इतर मुद्दे या अधिवेशनात चर्चेत आले. अशातच आज विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) अण्णा दादू बनसोडे यांची बिनविरोध आणि एकमतानं निवड करण्यात आलीय.

मुख्यमंत्र्यांकडून अण्णा बनसोडेंचं कौतुक!: "विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झालीय. त्याबद्दल मी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. बनसोडे यांनी बराचकाळ समाजकारण, राजकारणात काम केलंय. महानगरपालिका नगरसेवक ते आमदार आणि आता विधानसभा उपाध्यक्षपदी असा त्यांचा प्रवास हा नक्कीच अभिमानास्पद असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि अण्णा बनसोडे या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसंच, पुढं म्हणाले की, "महाराष्ट्र विधानमंडळाला फार मोठी परंपरा आहे. या गौरवशाली परंपरेला पुढं नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. भारताचं संविधान किती मोठं आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळते. संधीची समानता हे संविधानामुळं मिळालीय. आज बघू शकतो की, चहा टपरीवर काम करणारे पंतप्रधान झाले. ऑटो रिक्षा चालवणारे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि एक पान टपरीवाले राज्याचे उपाध्यक्ष झालेत" असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अण्णा बनसोडे यांचं कौतुक केलंय.

विरोधी पक्षनेतेपदाचं काय? विरोधकांचा सवाल : विधानसभेत उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी अण्णा बनसोडे यांचं कौतुक केलं. तर दुसरीकडं, विरोधी पक्षावर उपहासात्मक टीका केली. मुख्यमंत्री बोलल्यानंतर विरोधकांनी उपाध्यक्षपदाची निवड झाली. पण विरोधी पक्षनेते पदाचं काय? असा सवाल विरोधकांनी विचारला असता, "माझी आताही तयारी आहे. जो विरोधी पक्षनेता असेल त्याला माझी संमती आहे. पण हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे. ते जे निर्णय घेतील, तो मला मान्य आहे", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अण्णा बनसोडे यांचं अभिनंदन केलं. दरम्यान, यावेळी २०१९ विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडेंना पक्षाकडून एबी फॉर्म आपण कसा दिला. याबद्दल मजेशीर किस्सा अजित पवारांनी सांगितला. त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.

हेही वाचा :

  1. 'कुणाल कामरानं गाणं लिहिलं तर शिंदे गँगला मिरची लागली'; संजय राऊतांचा हल्लाबोल
  2. "हे कसलं मोदींचं हिंदुत्व? एकिकडं औरंगजेबाची कबर अन्...", हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.