ETV Bharat / state

एआयच्या माध्यमातून बारामतीत होत आहे ऊसाची शेती, जाणून घ्या फायदे! - AI SUGARCANE FARMING NEWS

बारामतीमधील शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाची लागवड केली. त्याचा नेमका काय फायदा होत आहे? या तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जातो? जाणून घ्या, सविस्तर माहिती

Sugarcane farming
एआय ऊस शेती (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 10, 2025 at 8:27 PM IST

Updated : April 11, 2025 at 5:09 PM IST

14 Min Read

पुणे- भारत हा शेतीप्रधान देश असून आजही मोठ्या प्रमाणावर शेती ही पारंपरिक पद्धतीनं केली जाते. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध संशोधन होतानादेखील पारंपारीक पद्धतीनं शेतीला प्राधान्य दिलं जातं. राज्यात तर ऊसाची शेती ही मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, एक वर्षापूर्वी बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून देशातील पहिला प्रयोग करत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसशेती शक्य केली आहे.

एआय तंत्रज्ञान शेती- बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट, ऑक्स्फर्ड विद्यापीठ यांनी एआय या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI sugarcane farming news) वापर करुन कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसशेती विकसित केली आहे. तब्बल एक हजार शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसावर हा प्रयोग करण्यात आला असून त्याचे चांगले आणि फायदेशीर असे परिणाम समोर आले आहेत. या शेतकऱ्यांचे लवकरच ऊस तोडणी होणार आहे. यात ऊसाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ होणार आहे.

AI sugarcane farming
एआय तंत्रज्ञान शेती (Source- ETV Bharat Reporter)

अशी झाली सुरुवात- ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांच्या दूरदृष्टीतून आणि पुढाकारातून 'सेंटर फॉर एक्सलन्स फार्म व्हाईब्ज' प्रकल्पाची उभारणी झाली. यामधून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा ऊस उत्पादन वाढ प्रकल्पाची मुहूर्त मेढ रोवली गेली. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर आणि मायकोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा याच्या मदतीनं भारतामध्ये सर्वप्रथम ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये या प्रकल्पाची उभारणी केली आहे. तसेच याचे निष्कर्ष मायकोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी नोंद घेऊन भारत दौऱ्यावर असताना या प्रकल्पाचं कौतुक केलं.

तामिळनाडूपेक्षाही महाराष्ट्र राज्याची ऊसाची उत्पादकता कमी- एकूण क्षेत्रफळाचा विचार करता भारत हा ऊस उत्पादनामध्ये सर्वात मोठा देश आहे. परंतु एकूण उत्पादकता पाहता ब्राझील, चिली यांच्या तुलनेत देशातील उत्पादकता खूप कमी आहे. भारतातील विविध राज्यातील उत्पादकतेमध्ये तामिळनाडूपेक्षाही महाराष्ट्र राज्याची ऊसाची उत्पादकता कमी आहे. २०२४-२५ च्या सर्वेक्षण अहवालानुसार, महाराष्ट्रात सुमारे १४.२० लक्ष हेक्टर ऊसाची लागवड झालेली आहे. यामधून एकूण अपेक्षित उत्पादन ११००.०० लाख मॅट्रिक टन मिळू शकते. त्यामधून ३० ते ३५ हजार कोटी रुपयेपर्यंत महसूल निर्मिती होणार आहे.

उत्पादन कमी येण्याची नेमकी कारणे काय?

१. जमिनीची कमी असणारी सुपीकता, सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब उपलब्ध अन्नद्रव्यांचे असंतुलन आणि त्यांची शोषण क्षमता.

२. मशागतीच्या अयोग्य पद्धती यामुळे जमिनीतील कठीणपणा मातीच्या भौतिक घटकांपैकी कणांची सापेक्ष घनता, सच्छिद्रता मातीच्या कणांची संरचना या सर्व घटकांची बदललेली स्थिती.

३. उच्च गुणवत्तेचे बियाण्याची कमतरता, केवळ घरचे घरी उपलब्ध असलेल्या ऊसाची लागवड करून निवड प्रक्रिया न करता कांडीने लागवड.

४. जमिनीच्या प्रतिनुसार ठिबक सिंचन प्रणालीचा वापर न करणं.

५. ठिबक सिंचनातून पिकाला गरजेप्रमाणे पाणी आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता न करणं यामुळे ऊसाच्या वाढीचा अवस्थेनुसार वाढ न होणे.

६. योग्य लागवड अंतर न ठेवता केवळ ऊसाची दाटीनं लागवड करणं

७. नको त्यावेळी केली जाणारे अंतर मशागतीची कामे.

८. फवारणी तंत्राचा अवलंब न करणं.

९. मजुरांची कमी होणारी उपलब्धता.

१०. लागवडीचा योग्य कालावधी व योग्य जातीची निवड करण्यात येणाऱ्या अडचणी.

११. प्रचंड प्रमाणात होणारा खतांचा आणि औषधांचा वापर

१२. ऊस शेतीमध्ये होणारा पाण्याचा अतिरिक्त वापर

१३. कीड आणि रोगांचा वाढत चाललेला प्रादुर्भाव

१४. ऊसामधील कमी साखरेचे प्रमाण आणि नियंत्रणातील त्रुटी

१५. तोडणीचा योग्य कालावधी ठरविताना येणाऱ्या अडचणी

१६. दिवसेंदिवस वाढत चाललेला एकरी उत्पादन खर्च

१७. निसर्गावर आधारित शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा तुटवडा

१८. स्थानिक शेतकऱ्यांना क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर संदर्भातील ज्ञानाचा असणारा अभाव ही कारणे आहेत.

एआय तंत्रज्ञानाचा ऊसशेतीत वापर (Source- ETV Bharat news)

ऊसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार या अडचणींवर मत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर हे मैलाचा दगड ठरणारे आहेत. तसेच वरील सर्व गोष्टी शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना रोजच्या रोज समजल्या म्हणजेच ऊसाला लागणाऱ्या निविष्ठा जसे की पाणी, खते, औषधे, तणनाशके, कधी, कुठं किती प्रमाणात वापरावे हे सर्व जर मोबाईलवर मिळाले तर तो स्वतः किंवा मजुराकडून सर्व बाबी पूर्ण करता येईल. यामध्ये सुसूत्रता आणणेसाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, यांचे एकत्रित प्रयत्नातून तयार केलेला ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या सोप्या तंत्रज्ञानानं करता येणार आहे.

ऊस उत्पादकांना कोणत्या गोष्टीसाठी मदत होणार

ज्या जमिनीमध्ये ऊस पिकाची लागवड करायचे आहे, त्याचे सखोल परीक्षण त्वरित करता आल्यामुळे वेळेची बचत होते. यामुळे जमिनीची सुपीकता सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, मातीची घनता या बाबींचे विश्लेषण मिळणार आहे. प्रत्यक्ष शेतातील मातीचा नमुना कोणत्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे, ती जागा समजेल. त्यामुळे उपग्रहाद्वारे मिळालेला जमीन सुपीकता परीक्षण अहवाल आणि प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष अहवाल यांच्या एकत्रित विश्लेषणावरून ऊसाची मूलभूत मात्रा (बेसल डोस) कोणता टाकला पाहिजे, हे समजणार आहे. ज्या वाणाचे बियाणे रोपे लागवड करणार ती रोपे विशिष्ट पद्धतीने म्हणजेच AI तंत्रानं वाढवून तयार केलेले असल्यामुळे रोपे सशक्त आणि निरोगी आहे. परंतु २१ दिवसात लागवडीयोग्य असणारी रोपे उपलब्ध होतील. ४० कॅव्हिटी मोठी कप साईझ असल्यामुळे ऊसाची रोपे मुळांचा जारवा जास्त असणारी असतील.

तंत्रज्ञानाचा कसा होतो वापर?ऊस रोपे लागवडीपूर्वी मूलभूत मात्रेपासून ते ऊस तुटून जाईपर्यंत अन्नद्रव्य, (खतांचे, जैविक, सेंद्रिय रासायनिक) माहिती रोजच्या रोज (VPD) मिळाल्यामुळे पिकाला जास्तीत जास्त शोषण करता येईल. जास्तीचे पाणी देणं टाळल्यामुळे आणि खतांचे वहन वस्थिरीकरण न होता १००% खते उपलब्ध होऊन शोषण होईल. यामुळे दीड महिन्यापासून फुटव्यांची संख्या, कांडीची लांबी, कांडींची संख्या, कांड्यांची आणि ऊसाची जाडी, ऊसाची उंची, कारखान्याला तुटून जाणारे ऊस आणि त्याचे सरासरी वजन ऊसातील ब्रिक्स, या सर्व परिमाणे दुपटीनं वाढणारी मिळणार असल्यामुळे दुप्पट उत्पादन वाढ होण्यास मदत होणार आहे.आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करून अशा प्रकारच्या ऊस शेतीत येणाऱ्या समस्यांवर यशस्वीपणे मात करू शकतो. हाच विचार समोर ठेवून बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने ऑक्सफर्ड विद्यापीठ व मायक्रोसॉफ्ट या जागतिक अग्रगण्य संस्थांबरोबर विशेष संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यात ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान जसे की सेंटलाईट इमेज कम्प्युटर व्हिजन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रिमोट सेन्सिंग आणि ग्राउंड दूध इमेजिंगचा वापर करून उत्पादन, साखर उतारा ठरविणे, हायपर स्पेक्ट्रल इमेज तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन मिळवणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हवामानाचा व पावसाचा सूक्ष्म अभ्यास करून अचूक अंदाज बांधणे, ऊस शेतीमध्ये जगामधील पहिल्या कॉजल मशीन लर्निंगचा वापर करून ३०% पर्यंत ऊस उत्पादन वाढविणे आहे. या प्रकल्प अंतर्गत इंटरॅक्टिव्ह आणि यूजर फ्रेंडली डॅशबोर्डच्या मदतीनं शेतकऱ्यांना हिट मॅप, सेटलाईट इमेजेस, क्रॉपिंग पॅटर्न रिकमंडेशन सिस्टीम, इरिगेशन मॅनेजमेंट, पेस्ट अँड डिसीज मॉनिटरिंग इत्यादी घटकांची माहिती ही स्वतःच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. तसेच निसर्गातून येणाऱ्या विविध प्रकारच्या माहितीला वापरून भविष्याचा अंदाज बांधणारे नवीन तंत्रज्ञान तयार करण्यात येत आहे. या प्रक्रियेत सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ऍसिनीक फ्युजन (ज्या मध्ये उपग्रह व ड्रोन च्या माहितीला जमिनीतून सेन्सर मार्फत येणाऱ्या डेटा सोबत एकत्र करून पीक व माती संदर्भात बहुमूल्य अशा गोष्टी समजावून घेतल्या जातात), स्पेस आय (ज्या मार्फत कृत्रिम बुद्धिमत्तेला वापरून उपग्रहामार्फत घेतले जाणारे शेतीचे छायाचित्रे हे अधिक स्पष्ट केले जातात) डीप एम.सी. (तंत्रज्ञान हे सेन्सर व हवामान नियंत्रणकक्षाकडून येणारा डेटा वापरून तापमान आणि पावसासंबंधित अचूक भाकीत करण्यासाठी वापरले जाते) अशा अनेक नाविन्यपूर्ण अल्गोरिदमचा उपयोग होत आहे.

शेतकऱ्यांना काय होणार फायदे

एआय हा प्रकल्प मायक्रोसॉफ्टच्या प्रोजेक्ट फार्मवाइब्सवर आधारित आहे. या प्रकल्पामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदे होणार आहेत.

१. सॅटलाईट मॅपिंग मुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची अचूक माहिती मिळाल्यानं ऊस पिकास लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यास मदत होणार आहे.

२. मातीचा सामु, क्षारता, ओलावा, नत्र, स्फुरद, पालाश आणि हवामानातील माहिती दर्शविणाऱ्या अत्याधुनिक सेंसर प्रणालीचा वापर केल्यामुळे पाणी, खत, कीड व रोगांच्या नियंत्रणाच्या नियोजनामध्ये मदत होणार आहे.

३. हायपरस्पेक्ट्रल कॅमेऱ्याच्या मदतीनं पीक निरीक्षण केल्यामुळे अचूक प्रमाणात खते आणि कीटकनाशके यांचे स्पॉट एप्लीकेशन करण्यास मदत होणार आहे.

४. खतांच्या योग्य वापरामुळे अधिकचा निचरा कमी होऊन भविष्यात जमिनीची सुपीकता वाढीस मदत होणार आहे.

५. शास्त्रोक्त पद्धतीने होणारया ऊस शेतीमुळे उत्पादन वाढण्यास आणि उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

६. शेतकऱ्यांना अपेक्षित साखर उतारा, उत्पादनाची माहिती आणि पीक काढणीचा अचूक कालावधी ठरविण्यासाठीदेखील या तंत्रज्ञानाची मदत होणार आहे.

७. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऊस उत्पादनामध्ये ३० टक्के अधिक वाढ अपेक्षित.

८. ऑक्सफर्ड विद्यापीठ संचलितः ऊस शेतीत कॉझल मशीन लर्निंगचा उपयोग जागतिक स्तरावर पहिल्यांदाच कॉझल मशीन लर्निंगचा उपयोग हा ऊस शेतीमध्ये करण्यात येणार आहे. जेणेकरून वेगवेगळ्या घटकांचा जसे की इरिगेशन व फर्टिगेशन अलर्ट, जमिनीचे आरोग्य इत्यादीचा पिकावर होणारा परिणाम ओळखता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढीस मदत मिळेल.

९. अत्याधुनिक ड्रोनद्वारे निरीक्षण आणि माहिती संकलनः उच्च दर्जाच्या हायपर व मल्टीस्पेट्रल कॅमेरा बसविलेले ड्रोन पिकांचे आरोग्य, कीड व रोग, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाण्याचा ताण, पिकांचे वर्गीकरण आणि काढणी नियोजन इत्यादी अचूक माहिती गोळा करण्यासाठी उपयुक्त ठरतील

पाण्याची बचत कशी होणार?- कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून आडसाली ऊसाला पाट पद्धतीने ३० ते ३५ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. यामुळे ३ कोटी लिटर पाणी दिले जाते. तसेच ठिबकद्वारे (AI)- जमिनीच्या प्रकारानुसार (AI) तंत्रानुसार केवळ ९० लाख लिटर ते १ कोटी लिटर पाणी पुरेसे होते. सर्वसाधारण ड्रीप पद्धतीपेक्षा पाण्याची बचत झाल्यामुळे बचत झालेल्या पाण्यामध्ये कमी कालावधीची पिके शेतकरी घेऊ शकतात. खतांच्या अतिवापरामुळे भारतीय शेतीचे भवितव्य धोक्यात आले आहे. गेल्या ४० वर्षांमध्ये भारताने शेती क्षेत्रात वाखाणण्याजोगी प्रगती केली असली तरीदेखील खतांचा आणि औषधांचा बेसुमार झालेला वापर हा धोक्याची घंटा ठरतोय. २००१-०२ मध्ये हेक्टरी सरासरी ९२ किलो रासायनिक खत वापरले जात होती. त्याची मात्रा वाढून आज (२०२३-२४) १३७ किलोपर्यंत पोहोचली आहे.

खतांच्या अतिरिक्त वापरामुळे पिकांची प्रतिकारशक्तीदेखील कमी होत चालली आहे. कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढीसाठी खतांचा अति जास्त प्रमाणात वापर केला जातो. मात्र, त्यामुळे जमिनीचा पोत खराब होतो. जैवविविधतेवर परिणाम होतो. पर्यावरणीय संकट निर्माण होते. रासायनिक खतांमुळे जमिनीतील सेंद्रिय घटक कमी होतात. मातीची सुपीकतादेखील कमी होत चालली आहे. याशिवाय, अति प्रमाणात वापरलेले रासायनिक घटक भूजलामध्ये मिसळतात. त्यामुळे पाण्यातील नायट्रेटचे प्रमाणदेखील वाढले आहे. अशा घटकांमुळे जमिनीमधील पाण्याची गुणवत्ता ढासळल्यामुळे पिण्याचे पाणी, पशुधनासाठी लागणारे पाणी आणि पिकासाठी लागणारे पाणी दुषित होत आहे. एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्या मधील १७१ गावांमध्ये पाण्यात नायट्रेटचे प्रमाण धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. ही परिस्थिती मानवी आरोग्यासाठी गंभीर समस्या निर्माण करू शकते. भविष्यात जमिनीचा पोत राखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी संतुलित खत वापर महत्त्वाचा ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन, जैविक आणि नैसर्गिक खतांचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. जेणेकरून जमिनीची सुपीकता, पाण्याची गुणवत्ता टिकून राहत आहे. भविष्यातील अन्नसुरक्षेचे संकट टाळता येणार आहे.

खतांच्या नियोजनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग- पिकाला लागणारी खतांची कार्यक्षमता (फर्टीलायझर यूज्ड एफिशियन्सी) तसेच अन्नद्रव्यांची उपलब्धता (नुट्रीयंट अपटेक) रेट वाढवल्यामुळे अमर्यादित होणारा खतांचा वापर टाळता येणार आहे. तसेच कार्बन सिक्वेस्ट्रेशन वर भर दिल्यामुळे जमिनीतील घटत चाललेले सेंद्रिय कर्बाचे प्रमाण पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे. क्रॉप स्ट्रेस मॅनेजमेंट आणि रोग प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे पिकांच्या उत्पादनात भर पडणार आहे. ए आय ड्रिवन फर्टीलायझर मॅनेजमेंट जसे की खतांमध्ये कोटिंग टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे जमिनीतील नाइट्रेटचे प्रमाणदेखील संतुलित राखण्यात मदत होणार आहे. जमिनीतील लाभकारक सूक्ष्मजीवांचा नंबर आणि विविधता राखण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी ठरणार आहे.

जास्त रासायनिक खतांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम- ज्या ठिकाणी खतांचा मारा जास्त होतो त्या ठिकाणी जमिनीची क्षारता १.०५ dS m/m पेक्षा वाढलेली असते. त्यावेळी पिकांना अन्नद्रव्य शोषण करणे कठीण जाते. अशा मातीमध्ये लाभकारक जीवाणूंची संख्या खूपच कमी आढळली आहे. AI सुपीक मातीचे एक ग्रॅम कणामध्ये ७.८ x १००० सहाय्यकारी सूक्ष्म जीवाणू आढळले. जेव्हा रासायनिक खतांचे प्रमाण जास्त होते, त्यावेळी हेच प्रमाण ५ x १०० पेक्षा कमी आढळलं आहे.

खते बचत- आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू, खोडवा ऊसाला लागणारी सर्व अन्नद्रव्य (खते) ऊस पिकाच्या गरजेनुसार दिल्यामुळे रोज वाढ होते. बेसल डोस फक्त प्रत्यक्ष जमिनीमध्ये लेबरद्वारे आणि तिथून पुढे सर्व खते ठिबकद्वारे दिल्यामुळे ३५% खतात बचत मुळांचे कार्यक्षेत्रात पाणी आणि अन्नद्रव्य उपलब्धता झाल्यामुळे महिन्याला ३.५ कांडीची निर्मिती होते. तर NON AI च्या ऊसामध्ये २ ते २.५ कांडीची निर्मिती होते.

ऊस कांडी- AI मुळे अन्नद्रव्यांचे शोषण आणि खतातील अन्नद्रव्यांची उपलब्धता यांचे समीकरण साधले गेल्यामुळे प्रति महिना २ ते २.५ कांडीच्या जागी ३.५ ते ४ कांड्यांची निर्मिती साधली जाते. त्यामुळे आडसाली ऊस तोडताना ५५ कांडी पूर्व हंगामी ऊस तुटताना ५० कांडी तर सुरू खोडवा ४५ कांडी प्राप्त होतात. कांडी संख्या वाढल्यामुळे प्रत्येक ऊसाचे वजन २ किलोने वाढणार आहे. सर्वसाधारण शेतकरी एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च रासायनिक खतावर करतात. AI पद्धतीनं १८ ते १९ हजार रुपयांमध्ये पूर्ण खत व्यवस्थापन होणार आहे. (शेणखताला खर्च वगळून) ऊस पिकाला साध्या पद्धतीने लागवडीपासून ते तोडणीपर्यंत एकूण ७० ते ८० लेबर लागतात.

कृत्रिक बुद्धिमत्ता (AI) पद्धतीने ऊसाचे उत्पादन समीकरण

१- ऊसाचे सरासरी वजन प्रती ऊस ३ ते ५ किलो

२- एकरमधील ऊस रोपे :- ४५०० (५ फुट x १.५ फुट)

३- एका बेटातील ऊस :- ८ ते १०

४- एकरातील कारखान्याला तुटून जाणारे ऊस :- ४२५००-४५०००

५- एका ऊसाचे सरासरी वजन: २.५ किलो ते ४.५ किलो

६- ऊसाचे एकरी वजन:- ४०००० ऊस x ३ किलो १२० टन उत्पादन

कीडसह रोग- कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र शेतकऱ्यांना संभाव्य हानीची जसे की खोडकीड, पायरीला, कांडे कीड, खवले कीड, हुमणी, लोकरी मावा तसेच पोकाबोंगा, तांबेरा या रोगांविषयी पूर्वकल्पना सूचना देत असल्यामुळे एका विशिष्ट ठिकाणी प्रादुर्भाव आटोक्यात आणणे तात्काळ शक्य होणार आहे. कमी फवारणी असल्यानं कमी खर्च होणार आहे.

जमिनीमधील सेंद्रिय कर्ब- साधारणपणे कोणतेही पीक उत्पादनानंतर त्या पिकाचे अवशेष परत जमिनीमध्ये गेले नाहीत, तसेच व्यवस्थापन अयोग्य असेल तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होतो. महाराष्ट्रमध्ये ऊसाखालील क्षेत्रामध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण साधारणपणे ०.४ ते ०.५ पर्यंत आहे. AI ऊस उत्पादन किंवा उत्पादन पद्धतीने सेंद्रिय पदार्थ वाढ झाल्यामुळे आणि अन्नद्रव्य शोषण, पुरवठा योग्य झाल्यामुळे एकरी १२० टन उत्पादन घेऊनसुद्धा सेंद्रिय कर्ब समान पातळीवर अथवा वाढल्याचं आढळले. सुरुवातीचा ०.९१% ते ऊस तुटून गेल्यानंतर १.०३% सेंद्रिय कर्ब आढळले.

क्षारयुक्त आणि चोपन जमिनीसाठी मदत - जमिनीमध्ये दिवसेंदिवस कमी होत जाणारी मातीची सुपीकता वाढत जाऊन उपलब्ध अन्नद्रव्य सूक्ष्म जीवाणूंची संख्या, जमिनीचे भौतिक घटक, सापेक्ष घनता, सछिद्रता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता या सर्व घटक साधारण पातळीवरती येण्यास मदत होत असते. अशा जमिनीमध्ये COM- २६५ बरोबरच PDN- १३००७ हा वाण शेतकरी A1 च्या मदतीने घेऊन ३० टक्के उत्पादन वाढवू शकतील.

प्रकल्पामुळे होणारे शेतकऱ्यांचे फायदे

१. उत्पन्न वाढ या प्रकल्पा अंतर्गत ४०% उत्पादन वाढ होऊ शकते.

२. मातीची सुपीकता सुधारणे ऊस पिकाला गरजे प्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि सेंद्रिय घटकांचा पुरवठा केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल.

३. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित फर्टिगेशन व्यवस्थापनामुळे खतांच्या वापरात सुमारे ३०% घट होते (ज्यामुळे शेतकऱ्याची एक कमीत कमी १०,००० ते जास्तीत जास्त १५,००० रुपयाची बचत होऊ शकते).

४. मातीतील ओलावा, तापमान आणि बाष्पीभवन यांवर आधारित अंदाजातून सिंचनाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत होईल. ज्यामुळे ४० ते ५०% पाण्याच बचत होईल (यामुळे शेतकरी उपलब्ध पाण्यात अधिकचे एक एकर क्षेत्र सिंचनाखाली आणू शकतो).

५. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्टमधील आमच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेल्या तांत्रिक अल्गोरिदमच्या मदतीनं आम्ही हवामान बदलाच्या डेटानुसार निवडक शेतकऱ्यांना पीक पद्धतीबद्दल अचूक सूचना देऊ शकतो.

६. उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायाचित्रांच्या आणि ग्राउंड टूथ डेटाच्या मदतीने, आपण ९८% पेक्षा जास्त अचूकतेने ऊसाच्या साखर उताऱ्याचा आणि उत्पादनाचा अंदाज लावू शकतो ज्यामुळे ऊस उद्योगांना प्रति प्लॉट कापणी खर्च कमी होण्यास मदत होते. यामुळे त्यांना उत्पादित साखर निर्यात धोरणे बनविण्यास देखील मदत होईल, यामुळे शेतकऱ्यांना प्रति टन २०० रुपयांपर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते व भविष्यात कारखान्यांना अधिकचा फायदा देखील अपेक्षित आहे, तसेच साखर उतारा ०.५ ते २% ने वाढवला जाईल.

७. एएनएन, जीपी, एमटी, एसव्हीआर इत्यादी एआय तंत्रांचा वापर करून संभाव्य वातावरणीय बदल जसे की पाऊस, पूर, दुष्काळ, बाष्पीभवन आणि इतर जल-हवामानविषयक घटकांचा अंदाज घेता येईल.

८. प्रस्तावित कामाचा अंतिम दीर्घकालीन परिणाम म्हणजे खते, कीटकनाशके, पाणी इत्यादी राष्ट्रीय संसाधनांचा अनुकूल आणि सुयोग्य वापर करणे. यामुळे रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादींची आयात कमी होण्यास मदत होईल. शेतकरी आणि राष्ट्र मजबूत होण्यास मदत होईल.

९. एआयच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या प्रयोगाने शेतकऱ्याना उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ आणि उत्पादन खर्चात २० ते ४० टक्क्यांची घट तसेच तीस टक्के पाण्याची बचत होणार आहे.

शेतकऱ्यांना १२,५०० रुपये सभासद नोंदणी खर्च- शेतकरी समूहासाठी एका गावातील किंवा लगतच्या क्षेत्रातील २५ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकतात. अशा शेतकऱ्यांचे सुरवातीला सभासद नोंदणी केली जाईल. तसेच स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी प्राधेनिधिक जागेवर करण्यात येईल. यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ओलावा आणि तापमान संवेदक बसवता येईल. ऊस लागवडीच्या पूर्वी माशागातीपासून ऊस रोपांची लागवड, ऊस वाढीच्या पाच महत्वाच्या अवस्था ते ऊस काढणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना सल्ला आणि मार्गदर्शन दिले जाईल. प्रति २ एकर ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना १२,५०० रुपये सभासद नोंदणी खर्च असेल.

एआयमध्येदेखील सबसिडी मिळणार- डॉ. भूषण गोसावी यांनी सांगितलं की ऊसामध्ये आम्ही नवीन क्रांती केली आहे. यात एआय या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन ऊसाच उत्पन्न हे एकेरी १६० टनापेक्षा कसा घेतलं जाऊ शकतं याचं सादरीकरण करण्यात आलं आहे. या प्रयोगाला सुरवात ही तीन वर्षापूर्वी करण्यात आली होती. मार्च २०२४ पासून एक हजार शेतकऱ्यांच्या शेतीत हा प्रयोग सुरू केला आहे. लवकरच हे प्रकल्प राज्याच्या ५० हजार शेतकऱ्यांच्या शेतीवर बसविण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे यासाठी राज्य शासनानदेखील जवळपास ५०० कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना आत्ता एआयमध्येदेखील सबसिडी मिळणार आहे.

एआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येक अपडेट- एआयच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शेतीमधील सर्व माहिती म्हणजेच माती, जमिनीची माहिती, खतांची माहिती, वातावरण बदलाची माहिती आणि नेमकी गरज काय आहे हे शक्य झालं आहे. तसेच जमिनीत जो सेन्सर लावण्यात येतो, त्यातून जमिनीचा ओलावा, तापमान आणि बदल याची माहिती मिळते. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे सॅटॅलाइटद्वारे मॉनिटरिंग केली जाते. याबाबत अलर्ट हे सातत्यानं शेतकऱ्यांना दिले जातात. शेतकऱ्यांच्या गेल्या उत्पादनाच्या ४० टक्के उत्पादनात वाढ होताना पाहायला मिळाली आहे, असंदेखील यावेळी डॉ. भूषण गोसावी यांनी सांगितलं.

१३० टन ऊस निघेल, अशी आशा- दौंडचे शेतकरी महेंद्र थोरात म्हणाले, आमची शेती वडिलोपार्जित असून २१ एकरमध्ये आम्ही ऊस तसेच केळीची शेती करत असतो .गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पारंपरिक शेती करत आलो आहे. आमच्या २ एकर जागेवर जुलै २०२४ मध्ये एआय शेतीला सुरवात केली. सध्या आमच्या २१ एकर जागेत २ एकरमध्ये एआयची शेती आणि दीड एकरमध्ये केळीची शेती आहे. पारंपारिक पद्धतीनं ऊसाची १६ एकरमध्ये शेती करत असतो. प्रत्येक अपडेट ही त्यांनी दिलेल्या मोबाईल ॲपवर मिळत असते. त्या ॲपवर दिलेल्या माहितीनुसार मी माझ्या बाकीच्या प्लॉटवरदेखील याची अंमलबजावणी करत आहे. माझ्या दोन एकर जमिनीतून १३० टन ऊस निघेल, अशी आशा आहे. जवळपास तीस टक्के फायदा होणार आहे. पूर्वी आम्ही काही पारंपारिक पद्धतीनं ऊसाची शेती केली होती. त्यात जवळपास आम्ही चार-चार तास पाणी देत होतो. तसेच ऊसाला कोणता रोग आला आहे, याची माहितीदेखील ऊसाच्या शेतावर जाऊन घेत होतो. मोठ्या प्रमाणावर पाण्याचं वापर हा ऊसाच्या शेतीसाठी केला होता.

एआय आणि बिगर एआयमध्ये एकरी हिशोब कसा-पारंपरिक शेतीत एकरी ५० ते ६० टन ऊस हा निघत असतो. त्याला खर्च हा कमीत कमी हा ६० ते ७० हजार येत असतो. उत्पादन हे २ लाखापर्यंत जात असते. तसेच जर एआयची माहिती घेतली तर एकरी शेतीमध्ये १०० टन ऊस हा निघणार आहे. त्यासाठी कमीत कमी ३० ते ४० हजार खर्च येतो. उत्पादन हा ३ लाख रुपयार्यंत जाणार आहे.

ऊसाची पारंपारिक शेती कशी केली जाते?- पारंपरिक ऊस शेतीमध्ये लागवडच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. शेतकरी साधारणत: मे महिन्यापासून लागवड करतात. यात अडसालीची लागण असते. ही लागवड मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यापासून केली जाते. दुसरी लागण सप्टेंबरपासून चालू होते. ती डिसेंबरपर्यंत असते. तिसरी पूर्व हंगामी लागण ही फेब्रुवारीपासून होते. आमच्याकडे शक्यतो अडसाली लागण करतात. पारंपरिक शेतीमध्ये लागणच्या वेळेस पहिल्यांदा पूर्वतयारी सगळी करून घ्यावी लागते. यामध्ये पहिले नांगरणी करून कल्टीवेटर मारणे आणि मग त्याच्यानंतर पट्टा काढून तयार झाला की बेणे लागण करावी लागते. बेणे तोडल्यानंतर त्याचे दोन पद्धती असतात. यात एक डोळा पद्धत आणि दोन डोळे पद्धत आहे. आपण दोन्हीपैकी एक सिलेक्शन करायचं. मग ते बेणे सरीत टाकून पाण्यात दाबून घेणे. साधारणतः हा पंधरा ते वीस दिवसात उगवण झाल्यावर जिथं जिथं डोळा उगवत नाही, तिथं नवीन डोळा टाकून सांधून घेणे. मग दर आठवड्याला माणूस लावून पाणी देणे. जसं जस ऊस मोठा होईल, तसंतसं जमिनीतून खत देणे. मग प्रत्यक्ष पाहणी करून जर एखादी रोगराई आली असेल तर स्प्रे केलं जातं. साधारणतः एक एकरमध्ये आठवड्याला भिजवायला दोन दिवस लागतात. एक एकर ऊसाच्या शेतीत साधारणत:हा ५० ते ६० टन हे ऊस येत असतो. त्याला खर्च एक लाखापर्यंत येत असतो. जेव्हा ऊस कारखान्याला जातो तेव्हा सगळं जाऊन एक लाखाचा जवळपास फायदा शेतकऱ्याला होत असतो.

पारंपरिक शेती करणारे बाळासाहेब दोरगे म्हणाले, मी माझ्या दीड एकरमध्ये गेल्या २० वर्षापासून पारंपरिक पद्धतीनं शेती करत आहे. मी स्वतः हा शेतकरी असून मीच ही शेती करत असतो. यात अंदाजेप्रमाणं शेती केली जाते. ऊसाची लागवड, ऊसाला पाणी हे देखील अंदाजे प्रमाणे दिलं जाते. पण आमचे सहकारी महेंद्र थोरात यांनी एआयचा जो काही प्लॅन्ट बसविला आहे, त्याची मदत आम्हालादेखील होते. आम्ही त्यांच्याकडूनदेखील ऊसाच्या संदर्भात माहिती घेत शेती करत आहोत. या तंत्रज्ञानाचा वापर हा सर्वांनी केला पाहिजे. आगामी काळात मीदेखील एआयद्वारे ऊसाची शेती करणार आहे.

हेही वाचा-

  1. 'एआय'मुळं शेतकऱ्यांना बांधावरच मिळणार पिकांवरील रोगाची माहिती; कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं संशोधन
  2. देशातील पहिला प्रयोग! एआयच्या माध्यमातून करण्यात आली उसाची शेती; काय आहेत फायदे ?

Last Updated : April 11, 2025 at 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.