ETV Bharat / state

चार महिन्यापूर्वी नोकरीला लागलेल्या चालकाकडून व्यापाऱ्याचा विश्वासघात; साडेतीन कोटींचे सोने घेऊन फरार - SHIRDI CRIME

शिर्डीत आलेल्या सोने व्यापाऱ्याकडील सुमारे साडेतीन कोटींचे सोने घेऊन चालक फरार झाला. पोलिसांकडून आरोपी चालकाचा शोध घेण्यात येत आहे.

Shirdi 4 Crores Gold Theft
आरोपी वाहनचालक (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2025 at 7:22 AM IST

Updated : May 15, 2025 at 10:05 AM IST

2 Min Read

शिर्डी (अहिल्यानगर) - शिर्डीतील एका हॉटेलमधून तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपयांची रोकड घेऊन चारचाकी चालक फरार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (shirdi police) करण्यात आला.

मुंबई येथील सोन्याचे व्यापारी विजयसिंह खिशी यांनी आपल्या होलसेल सोन्याच्या फर्ममधून जवळपास 4 किलो 873 ग्रॅम वजनाचे दागिने 7 मे रोजी विक्रीसाठी शिर्डी आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आणले होते. त्यांच्यासोबत दोन सहकारी होते. कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार हे तिघे शिर्डीतील हॉटेल साई सुनीतामध्ये रुम नंबर 201 मध्ये मुक्कामी थांबले होते. सोन्याचे व्यापारी विजयसिंह खिशी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध सोनार दुकानांमध्ये या दागिन्यांची विक्री करण्यासाठी जात होते. त्यानंतर रात्री पुन्हा हॉटेलमध्ये परत येत होते.

साडेतीन कोटींचे सोने घेऊन चालक फरार (Source- ETV Bharat Reporter)

13 मे रोजी रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमाराला सोन्याचे व्यापारी खिशी, कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार हे तिघेही जेवण करून ते आपल्या खोलीत झोपले होते. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग बेड आणि टेबलच्यामध्ये ठेवून खोली आतून बंद केलेली होती. पुढील दिवशी म्हणजे 14 मे रोजी सकाळी 6 वाजता खिशी यांचा चुलत भाऊ शैलेंद्रसिंह हा त्यांच्याकडील पेमेंट घेण्यासाठी हॉटेलमध्ये आला. त्यावेळी खोलीचा दरवाजा उघडाच आढळून आला. खोलीच्या आतमध्ये पाहता चालक सुरेश कुमार गायब होता. त्याचे मोबाईल फोन आणि कपडे खोलीतच ठेवलेले होते. यानंतर खिशी यांनी तात्काळ आपल्या सोन्याच्या बॅगेची तपासणी केली. त्यामध्ये असलेले सुमारे 3.5 किलो वजनाचे सोन्याचे दागिने ( अंदाजे किंमत 3 कोटी 22 लाख रुपये) आणि त्याचबरोबर 4 लाख रुपयांची रोकड गायब असल्याचं दिसून आलं. यानंतर खिशी यांच्यासह कामगार चंद्रप्रकाश प्रजापती यांनी चालक सुरेश कुमारचा शिर्डी आणि परिसरात शोध घेतला असता तो कोठेही सापडला नाही.

Shirdi 4 Crores Gold Theft
पोलिसात दिलेली तक्रार (Source- ETV Bharat Reporter)

चोरीमागे किती जणांचा हात? सोने व्यापारी खिशी यांनी या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटलं, गेल्या चार महिन्यांपासून चालक सुरेश कुमार हा त्यांच्या सेवेत कार्यरत होता. त्यांनी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून व्यवसायिक व्यवहारात सामावून घेतले होतं. मात्र, त्यानं या विश्वासाचा गैरफायदा घेत चोरी केल्याचा आरोप खिशी यांनी केला आहे. हॉटेल परिसरातील तसेच हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि परिसरातील इतर माहिती गोळा केली जात आहे. चालक सुरेश कुमारनं ही चोरी एकट्यानं केली की त्याच्यामागे आणखी कुणाचा हात आहे, याचा तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

हेही वाचा-

  1. परप्रांतीय मामा-भाच्याकडून अल्पवयीन मुलीची हत्या; आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  2. ...तिला इन्स्टावर केला मेसेज; पुण्यातील 'साई'नाथला नगरमध्ये नेऊन संपवलं

Last Updated : May 15, 2025 at 10:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.