छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्र हितासाठी जे कुणी येईल, आम्ही त्यांना सोबत घ्यायला तयार आहोत. आम्ही सेटिंगचे राजकारण करत नाहीत. आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येत आहोत," असं वक्तव्य उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं. सरकारमध्ये भांडण लागले असून कोणीही राज्याचा विचार करायला तयार नाहीये. भाजपाला माझ्या आजोबांनी वाढवले आणि देशभरात पाठिंबा दिला, त्याच परिवारला भाजपाने तोडलं आणि निचपणा केला, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली. पाणी प्रश्नावर हल्लाबोल मोर्चामध्ये सामील होण्यासाठी ते आले होते.
भाजपाने परिवार फोडला : उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुस्तक लिहिले, त्याबाबत अनेकांनी टीका केली. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी, "पुस्तकाचे प्रकाशन होऊ द्या, सगळे वाचतील. मी पुस्तक वाचले नाही, प्रकाशन झाल्यावर वाचेल," असंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर "पुस्तकात सांगितलेले अनुभव आहेत. शिवसेना फोडली हे सत्य आहे. संजय राऊत आणि सूरज चव्हाण यांनी पक्षासाठी जेल भोगली. ज्यांचे चुकले नाही, ते लोक आमच्या सोबत आहेत. जेलच्या भीतीने पळाले, ज्यांनी पैसे खाल्ले आणि भ्रष्टाचार करून पळाले ते भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले. भाजपाला माझ्या आजोबांनी वाढवले आणि देशभरात पाठिंबा दिला, त्याच परिवाराला भाजपाने तोडलं आणि निचपणा केला," अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली.
सरकारमधील पक्षांमध्ये भांडण : "छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी देण्यासाठी यांनी वचन दिले होते. निवडणुकीपूर्वीचे वचन पूर्ण करत नसून सरकारमधील तिघांमध्ये भांडण लागले आहे. ही भांडणे एकमेकांच्या हिताची असून कोणाला बंगला हवाय तर कुणाला पालकमंत्री पद हवय. महाराष्ट्र हितासाठी या तिन्ही पक्षातून कोणी बोलत नाही," अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. "एवढे घाणेरडे राजकारण देशांनी पहिले नव्हते. भाजपा मागील काही वर्षात अतिशय घाणेरडे राजकारण करत आहे. राज्यात एकसुद्धा खाते कार्यरत नसणारे मुख्यमंत्री काम करत आहेत. सरकारी अपयश असल्याने पाण्याचा प्रश्न दिसत आहे. 2100 रुपये देऊ म्हणणारे लाडक्या बहिणीला 500 रुपये देतात. महाराष्ट्रात कुठलीही वचनपूर्ती होत नाही. आज आरोप करणाऱ्यांना थोडातरी लाज वाटली पाहिजे. थोडातरी लाज वाटत असेल तर चेहरा लपवतील," अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
हेही वाचा :