पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पुण्यात काल आगमन झालं. दरम्यान, आज पुण्यात दोन्ही पालख्या मुक्कामाला असताना सकाळपासून मोठ्या संख्येनं वारकरी तसंच पुणेकर नागरिक हे संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या दर्शनासाठी रांगेत उभं राहून दर्शन घेत आहेत. यादरम्यान शहरातील पेठ भागात आजूबाजूला पुणेकर नागरिक तसंच विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी : पुण्यातील नाना पेठ येथील श्री निवडुंगा विठोबा देवस्थान ट्रस्ट येथील मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी आहे. तर भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामी असून महिला व पुरुषांच्या दर्शनासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच दोन्ही मंदिरात आणि आजूबाजूच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, लाखो भाविक आणि पुणेकर नागरिक पालखीच्या दर्शनासाठी आले असून भवानी पेठेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

वारकऱ्यांच्या सोयीसाठी मोठी तयारी : याचबरोबर, पुणे शहरात पालखी मुक्कामी असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर वारकरी हे पुण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळं वारकऱ्यांच्या सोयीसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी वारकऱ्यांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था विविध सामाजिक संस्थांच्यावतीनं करण्यात आली आहे. याशिवाय, ठिकठिकाणी वैद्यकीय व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा -