धुळे : चिलारे गावच्या शिवारात टिटवा गावाच्या रोडावरील शेतातील घरात गांजाचा अवैधरित्या साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. होती. चिलारे-टिटवा (ता. शिरपूर) शिवारात असलेल्या एका शेतातील घरात छापा घालून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४२ लाख ३५ हजार रुपये किमतीचा हा तब्बल सहा क्विंटल पाच किलो बंदी असलेला अमली पदार्थ गांजा जप्त केला. श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री केल्यावर २9 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांचा छापा - शिरपूर तालुक्यातील चिलारे गाव शिवारात टिटवा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेतातल्या एका घरात विक्री करण्यासाठी अंमली पदार्थ (गांजाची) अवैधरित्या साठवणूक करण्यात आली असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेचे पथक संबंधित ठिकाणी धडकले. यावेळी रविंद्र गणेशा पावरा याने गांजाची साठवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना यासंदर्भात माहिती दिल्यावर निरीक्षक श्रीराम पवार यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह दोन पथकं तयार करुन छापा टाकला. यावेळी घटनास्थळी आढळलेला अमली पदार्थ गांजा हस्तगत करण्यात आला. त्यानंतर आरिफ रमजान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रविंद्र गणेश पावरा, रा. चिलारे (ता. शिरपूर) यांच्या विरुध्द गुंगीकारक औषधे द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत विविध कलमान्वये शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कामगिरी बजावणारे पोलीस - ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, जयपाल हिरे, पोउनि. अमित माळी, पोउनि. सुनिल वसावे, शिरपूर तालुका पो. ठाणे, तसंच पोहवा. आरीफ पठाण, पोहवा. पवन गवळी, पोहवा. पंकज खैरमोडे, पो कॉ. मयूर पाटील, पो कॉ. योगेश जगताप, पो कॉ. जगदीश सूर्यवंशी, पो कॉ. कमलेश सूर्यवंशी, पो कॉ. राहुल गिरी, चालक पो कॉ. गिते, पो कॉ. गुलाब पाटील सर्व स्थानिक गुन्हे शाखा, धुळे तसंच पोहवा. राजू ढिसले, पो कॉ. प्रकाश भिल, पो कॉ. ग्यानसिंग पावरा, पो कॉ. रोहिदास पावरा, सर्व नेमणूक शिरपूर तालुका पोलीस स्टेशन यांनी संयुक्तिकपणे केली अशी माहिती देण्यात आली आहे.
हेहीवाचा...