धुळे: वनविभागाच्या अधिकार्यांना गस्तीदरम्यान नियत क्षेत्र आंबा कक्ष क्रमांक 833 मध्ये मका आणि ज्वारीच्या शेतातून संशयीत बाहेर येताना दिसताच पथकाला पाहून ते मध्यप्रदेशच्या दिशेने पसार झाले. यावेळी यंत्रणेने छापेमारी करत 56 लाख 85 हजार 700 रुपये किंमतीचा हिरवट, ओलसर गांजा जप्त केला. पळासनेर वनपाल बीपीन महाजन यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द शिरपुर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पेट्रोलिंग करताना पकडला दीड लाखांचा गांजा : शिरपूर तालुक्यातील सांगवी वनविभागातील अंबा कक्ष क्षेत्रात वनरक्षक पवन पवार हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली लक्षात येताच त्यांनी सदर शेतामध्ये धाव घेतली असता, त्यांना पाहून काही संशयित लोक त्या ठिकाणाहून पळून गेले. मात्र मका, ज्वारी, बाजारीच्या उभ्या पिकात प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवून ठेवलेला 56 लाख 85 हजार रुपयांचा अकराशे किलो गांजा वनविभागाच्या गस्त पथकाने जप्त केला. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
रिक्षामध्ये आढळला 30 किलो गांजा: तसेच शिरपूर तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे आपल्या पथकासह खिलारे शिवारात पेट्रोलिंग करत असताना, त्यांना संशयास्पद रिक्षा आढळली. यावेळेस पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सादर रिक्षाची तपासणी केली असता, त्या रिक्षामध्ये जवळपास दीड लाखांचा 30 किलो गांजा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना एका रिक्षासह ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई करत असल्याची माहिती, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली कारवाई : ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सुनील वसावे, मिलिंद पवार, उदय पवार, हवालदार संतोष पाटील, हवालदार संदीप ठाकरे, हवालदार राजु ढिसले, हवालदार जाकीरोद्दीन शेख, हवालदार जगन्नाथ कोळी, हवालदार दिनेश सोनवणे, कॉन्स्टेबल जयेश मोरे, कॉन्स्टेबल मनोज नेरकर, कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर, कॉन्स्टेबल मुकेश पावरा, कॉन्स्टेबल ग्यानसिंग पावरा, चालक हवालदार अल्ताफबेग मिर्झा, चालक कॉन्स्टेबल इसरार फारुकी, तसेच वनविभागाचे धुळे उपवनसरंक्षक नितीन कुमारसिंग, शिरपूर सहाय्यक वनसंरक्षक राहुल घरट, सांगवी वनपरिक्षेत्रीय अधिकारी काशीनाथ देवरे, पळासनेर वनपाल बिपीन महाजन आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.
हेही वाचा -