ETV Bharat / state

नवजात बाळाला आईनेच दिले 65 चटके; ग्रीन कॉरिडॉर करत रुग्णालयात हलवलं, अघोरी कृत्यानं खळबळ

अवघ्या २२ दिवसाचं बाळ हृदयाच्या त्रासामुळं रडत होतं. त्यावर उपचार करण्यासाठी आईनं बाळाच्या पोटावर तब्बल 65 वेळा चटके देण्याचं अघोरी कृत्य केलं.

Melghat News
नवजात बाळ (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 27, 2025 at 8:31 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

अमरावती : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात अंधश्रद्धेची घटना घडली. अवघ्या बावीस दिवसाचं बाळ हृदयाच्या त्रासामुळं रडत होतं. त्यामुळं बाळाच्या पोटावर 65 चटके देण्याचं अघोरी कृत्य त्याच्या आईनेच केलं. या अघोरी कृत्यामुळं बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात असणाऱ्या सिमोरी गावातील त्या बाळावर त्वरीत उपचार व्हावेत यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अमरावती ते नागपूर 'ग्रीन कॉरिडॉर' निर्माण करण्याचे आदेश दिले. बुधवारी रात्री बाळाला नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

असा आहे संपूर्ण प्रकार : "अचलपूर इथं 3 फेब्रुवारीला जन्मलेल्या बाळाला हृदयाचा त्रास असल्यानं ते सतत रडायचं. सतत रडत असल्यानं त्याच्या आईनं उपचार म्हणून चक्क विळा गरम करून त्याच्या पोटावर चटके दिले," अशी माहिती बाळाच्या वडिलांनी पोलिसांना दिली. हा धक्कादायक प्रकार कळताच चिखलदरा पोलिसांनी बाळाच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पालकमंत्र्यांच्या आदेशानं बाळासाठी 'ग्रीन कॉरिडॉर' : या गंभीर घटनेची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना बाळाला वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे आदेश दिलेत. पोलीस अधीक्षकांनी बुधवारी रात्री बाळाला योग्य उपचाराकरिता नागपूर इथल्या खासगी रुग्णालयात हलवण्याकरिता अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय ते नागपूर शहरातील खासगी रुग्णालयापर्यंत खास 'ग्रीन कॉरिडॉर' निर्माण केला. बुधवारी रात्री अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यळाचा‌ वापर करत विशेष रुग्णवाहिकेतून त्या बाळाला नागपूर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. "पीडित बाळावर आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत," असं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. महालक्ष्मी अन् सात रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार, महालक्ष्मी पुलाचे काम 'या' तारखेपर्यंत पूर्ण होणार
  2. कोल्हापूर पोलीस नागपुरातील प्रशांत कोरटकरच्या घरी दाखल; 'तो' मात्र नॉट रिचेबल
  3. "एक दिवस गावकऱ्यांसोबत", गावातील अडचणीत सोडवण्यासाठी प्रशासन बांधावर