ETV Bharat / state

दुचाकीचा कट लागल्यानं तरुणाचा खून: धुळ्यातील घटनेनं नागरिक हादरले - YOUTH KILLED IN DHULE

दुचाकीचा कट लागल्यानं संतप्त झालेल्या मारेकऱ्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या तरुणाचं डोकं मारेकऱ्यांनी रोडवर आदळल्यानं त्याची मृत्यू झाला.

Youth Killed In Dhule
संग्रहित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 18, 2025 at 12:18 PM IST

Updated : April 18, 2025 at 3:03 PM IST

1 Min Read

धुळे : दुचाकीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरुन 18 वर्षीय तरुणाचं डोकं सिमेंटच्या रस्त्यावर आपटून त्याचा खून केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना धुळे शहरातील नंदीरोडवर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. फैज अहमद मुराद हुसैन अन्सारी असं खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी तरुणाच्या नातेवाईकानं शहरातील चाळीसगांव रोड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी लागलीच तपासाची चक्र फिरवत दोन संशयिताना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश घुसर यांनी यावेळी दिली.

दुचाकीचा कट मारल्यानं तरुणाचा खून : "धुळे शहरातील ग.नं. 7 मधील मच्छी बाजार परिसरातील निशांत चौकात राहणारा फैज अहमद मुराद हुसैन अन्सारी हा गुरुवारी रात्री नंदी रोड वरील एनर जिम जवळून दुचाकीनं जात होता. यावेळी समोरुन येणाऱ्या वाहनाला कट लागल्याच्या कारणावरुन अज्ञात दोन जणांनी फैज अन्सारी यास बेदम मारहाण केली. शिवाय त्यास जीवेठार मारण्याच्या उद्देशानं दोन्ही हातांनी पकडून सिमेंट काँक्रीटच्या रोडवर त्याचं डोकं पाच ते सहा वेळेस आदळलं. यात फैज गंभीर जखमी झाला. यावेळी त्याच्या छातीवर लाथाबुक्क्यांनी देखील जबर मारहाण करुन त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी फैजचे नातेवाईक मोहम्मद साजीद अब्दुल लतीफ अन्सारी यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे," अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुचाकीचा कट लागल्यानं तरुणाचा खून: धुळ्यातील घटनेनं नागरिक हादरले (Reporter)

अज्ञात दोन जणांविरोधात खुनाचा गुन्हा : या प्रकरणी अज्ञात दोन जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत फैज अन्सारी हा धुळे शहरातील एका मेडीकल स्टोअर्सवर कामाला होता. रात्री तो आपलं काम पूर्ण करून घरी परतत असताना ही घटना घडली अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली. "या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन संशयिताना ताब्यात घेतलं असून त्यात एका अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत," अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश घुसर यांनी दिली.

हेही वाचा :

  1. पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केला पतीचा खून; विषारी सापाला सोडलं पलंगावर अन् मग झालं असं काही
  2. कोयत्यानं सपासप वार करत भाजपा कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, पक्ष कार्यालयाजवळ घडला गुन्हा
  3. पुण्यातील व्यवसायिकाची बिहारमध्ये हत्या, तीन शहरांमधील पोलिसांकडून तपास सुरू

Last Updated : April 18, 2025 at 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.