पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकानं जवळपास सहा लाख रुपये किमतीचा १० किलो १३८ ग्रॅम गांजा जप्त केलाय. हरीश मदन सोनवणे या २७ वर्षांच्या व्यक्तीकडून पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केलाय.
एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल : अंमली पदार्थ विरोधी पोलीस सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळे सौदागर येथील प्रथमेश रेस्टोबारजवळ पेट्रोलिंग करत असताना त्यांना हरीश मदन सोनवणे हा एक संशियत दुचाकी उभा असलेला तरुण दिसला. संशयित असल्यानं पोलिसांनी त्याच्याकडं असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्याच्याजवळ जवळपास १० किलो १३८ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यामुळं अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकानं हरीश मदन सोनवणे याला अटक करून त्याच्यावर एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केलाय.
क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत : दरम्यान, हरीश मदन सोनवणे हा इसम पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत कंत्राट बेसवर क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मूळचा शिरपूर (धुळे) या गावचा असून सध्या पिंपरी येथे राहतो. सदर १० किलोचा गांजा त्यानं आपल्या गावाहून मागवला असून पिंपरी चिंचवड शहरात विक्रीसाठी तो आणण्यात आणल्याची माहिती त्याच्याकडून मिळतेय. त्यामुळं अशा सुशिक्षित व्यक्तीकडून असं कृत्य घडल्यामुळं शहरात लोकांकडून संतापजनक प्रतिक्रिया समोर येतायेत.
हेही वाचा :
- 'कुणाल कामरानं गाणं लिहिलं तर शिंदे गँगला मिरची लागली'; संजय राऊतांचा हल्लाबोल
- "हे कसलं मोदींचं हिंदुत्व? एकिकडं औरंगजेबाची कबर अन्...", हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका
- अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; विरोधी पक्षनेतेपदाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...