सिल्हेट ZIM Beat BAN : झिम्बाब्वे क्रिकेट संघानं बांगलादेशला त्यांच्याच घरच्या मैदानावर रोमहर्षक पद्धतीनं हरवून क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे. कसोटी क्रमवारीत 12व्या क्रमांकावर असलेल्या झिम्बाब्वेनं 9व्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेश संघाला पराभूत करून कसोटी क्रिकेटमध्ये चमत्कार केला. झिम्बाब्वेनं मालिकेतील पहिल्या कसोटीत यजमान बांगलादेशचा 3 विकेट्सनं पराभव केला आणि कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. झिम्बाब्वेनें पहिला कसोटी सामना अवघ्या 4 दिवसांत जिंकला. कर्णधार म्हणून क्रेग एर्विनचा हा पहिलाच कसोटी विजय आहे. त्याच वेळी, झिम्बाब्वेला 4 वर्षांनंतर पहिला कसोटी विजय मिळाला. संघाला शेवटचा मार्च 2021 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी विजय मिळाला होता. इतकंच नाही तर झिम्बाब्वेनं 6 वर्षांनी बांगलादेशमध्ये कसोटी विजय मिळवला आहे.
Zimbabwe replicate their 2018 heroics to clinch another Test victory in Sylhet 🔥#BANvZIM 📝: https://t.co/fipkX4Y5j5 pic.twitter.com/LN1biJkCob
— ICC (@ICC) April 23, 2025
ब्रायन बेनेटची दोन्ही डावात अर्धशतकं : झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 174 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात पूर्ण केलं. झिम्बाब्वेच्या विजयाचा नायक सलामीवीर ब्रायन बेनेट होता, ज्यानं दोन्ही डावात शानदार अर्धशतकं झळकावली. झिम्बाब्वेकडून त्यानं पहिल्या डावात 57 धावा केल्या तर दुसऱ्या डावात 54 धावांची महत्त्वाची खेळी केली.
झिम्बाब्वेच्या पहिल्या डावात 273 धावा : बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका 20 एप्रिल रोजी सिल्हेटमधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू झाली. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण पहिल्या डावात त्यांचा डाव 191 धावांवर संपला. प्रत्युत्तरात, ब्रायन बेनेट आणि शॉन विल्यम्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर झिम्बाब्वेनं पहिल्या डावात 273 धावा करून 82 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर बांगलादेशनं दुसऱ्या डावात 1 विकेट गमावून 57 धावा केल्या होत्या.
Zimbabwe's first Test win in over four years was inspired by some top performances 💥
— ICC (@ICC) April 23, 2025
Read how the first #BANvZIM Test unfolded ⬇️https://t.co/A5ibIvPXll
तिसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात पावसामुळं एकही चेंडू टाकता आला नाही. त्यानंतर कर्णधार शांतो आणि मोमिनुल हक (47) यांच्या खेळीमुळं बांगलादेश तिसऱ्या दिवशी पुनरागमन करू शकला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. झिम्बाब्वेनं मोमिनुल आणि मुशफिकुर रहीम यांना एकामागोमाग एक बाद केलं. परंतु शांतो आणि झाकीर यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 39 धावांची भागीदारी करून पुढील कोणताही धक्का बसू नये याची खात्री केली. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझारबानीनं 51 धावांत तीन विकेट्स घेतल्या.
बांगलादेशचा संघ 255 धावांवर सर्वबाद : तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस, बांगलादेशनं 4 विकेट गमावल्यानंतर 194 धावा केल्या होत्या. यानंतर, चौथ्या दिवशी, यजमान संघाला त्यांच्या धावसंख्येत फक्त 61 धावा जोडता आल्या आणि त्यांचा संघ 255 धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी 174 धावांचं लक्ष्य मिळालं. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून नझमुल हसन शांतोनं सर्वाधिक 60 धावा केल्या. दरम्यान, जाकर अलीनं 58 धावांचं योगदान दिलं.
Player of the Match in the first Test against Bangladesh in Sylhet✅
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) April 23, 2025
Blessing Muzarabani for his bowling figures of 3/50 & 6/72#BANvZIM pic.twitter.com/ecb3NxM62n
झिम्बाब्वेचा विजय : लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचे सलामीवीर ब्रायन बेनेट आणि बेन करन यांनी शानदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 95 धावांची भागीदारी झाली. बेन करन 44 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, विकेट्सची झुंबड उडाली. ब्रायन बेनेटला मेहदी हसन मिराजनं 54 धावांवर बाद केलं आणि त्यानंतर झिम्बाब्वेचे सहा फलंदाज बाद झाले आणि धावसंख्या 145 पर्यंत पोहोचली. यानंतर वेस्ली माधेवरे आणि वेलिंग्टन मसाकादझा यांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्या संघाला लक्ष्याच्या जवळ आणलं. वेलिंग्टन मसाकादझा 12 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मसाकाड्झा बाद झाल्यानंतर, माधेवेरेनं रिचर्ड नगारावासोबत जबाबदारी स्वीकारली आणि संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवल्यानंतरच सुटकेचा नि:श्वास सोडला.
हेही वाचा :