लंडन WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा दुसरा दिवस देखील पहिल्या दिवसाइतकाच रोमांचक ठरला. पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानं 5 बळी घेत खळबळ उडवून दिली, तर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं दक्षिण आफ्रिकेच्या संघातील अर्ध्याहून अधिक खेळाडूंना एकट्यानं बाद करुन खळबळ उडवून दिली. कमिन्सनं 18.1 षटकांत 28 धावा देत 6 बळी घेतले. यासह कमिन्सनं कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी पूर्ण केले. तो कसोटीत 300 बळी घेणारा ऑस्ट्रेलियाचा एकूण आठवा आणि सहावा वेगवान गोलंदाज ठरला. त्यानं त्याच्या 68व्या कसोटी सामन्यातील 126व्या डावात ही कामगिरी केली.

काय केला विक्रम : कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये नवव्यांदा 5 विकेट घेण्याचा विक्रम पॅट कमिन्सनं केला. अशाप्रकारे तो कसोटीत सर्वाधिक 5 बळी घेणारा संयुक्त दुसरा गोलंदाज बनला. त्यानं नवव्यांदा ही कामगिरी केली आणि रिची बेनॉची बरोबरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याचा विक्रम इम्रान खानच्या नावावर आहे. इम्राननं 12 वेळा 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता.
Day 3 might decide who takes home the #WTC25 title 🏆
— ICC (@ICC) June 13, 2025
How to watch all the action ➡️ https://t.co/DA3Av9WSkU pic.twitter.com/z6fdyMD0i3
कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक 5 बळी घेणारे कर्णधार :
- 12 - इम्रान खान
- 9 – पॅट कमिन्स*
- 9 - रिची बेनॉ
- 8 - बिशन सिंग बेदी
- 7 - कोर्टनी वॉल्श
- 7 - जेसन होल्डर
300 Test wickets ✅
— ICC (@ICC) June 12, 2025
Six-for in the #WTC25 Final ✅
Australia captain Pat Cummins continues to set the standard 🌟 pic.twitter.com/qQRejPh1Ck
पहिलाच कर्णधार : आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 5 बळी घेण्याची कामगिरी करणारा पॅट कमिन्स हा जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. आयसीसी फायनलच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं. यावरुन ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा हा विक्रम किती मोठा आहे याची कल्पना येऊ शकते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कमिन्स हा कर्णधार म्हणून सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज आहे. त्याच्या पुढं फक्त रिची बेनॉ आणि इम्रान खान आहेत. आणखी 3 विकेट्स घेताच तो सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा कर्णधार बनेल.
Unforgettable moments from Day 2 of the Ultimate Test ✨#WTC25 #SAvAUS pic.twitter.com/SIMLdKO7Zn
— ICC (@ICC) June 12, 2025
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारे कर्णधार :
- इम्रान खान - 187
- रिची बेनॉ - 138
- पॅट कमिन्स - 136*
- गॅरी सोबर्स - 117
- डॅनियल व्हेटोरी - 116
- कपिल देव - 111
Pat Cummins' spirited bowling effort wraps up the Proteas innings, handing Australia a healthy lead 🙌#SAvAUS
— ICC (@ICC) June 12, 2025
Follow LIVE ➡️ https://t.co/LgFXTd0RHt pic.twitter.com/w5fjZN3QAR
हेही वाचा :