बंगळुरु Virat Kohli in Problem : बंगळुरुमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात स्टार खेळाडू विराट कोहली देखील टीकेच्या भोवऱ्यात सापडला आहे. बेंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात अनेकांना आधीच अटक करण्यात आली आहे. पण आता एका स्थानिक व्यक्तीनं टीम इंडिया आणि आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. या मागणीसह त्या व्यक्तीनं कोहलीविरुद्ध बेंगळुरूतील कब्बन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पहिल्यांदा जिंकलं आयपीएल : मंगळवार 3 जून रोजी अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाब किंग्जचा पराभव केला आणि अशा प्रकारे पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद जिंकलं. या विजयानंतर संपूर्ण बेंगळुरुमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा संपूर्ण संघ अहमदाबादहून ट्रॉफी घेऊन परतला तेव्हा बेंगळुरुमध्ये एक अद्भुत परिस्थिती होती आणि रस्त्यावर चाहत्यांची मोठी गर्दी होती. यादरम्यान, प्रथम कर्नाटक सरकारनं विधानसभेजवळ संघाचा विजय साजरा केला आणि नंतर संपूर्ण संघ चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गेला, जिथं मोठ्या संख्येनं चाहते आधीच उपस्थित होते.
Bengaluru | A complaint has been submitted at the Cubbon Park Police Station against cricketer Virat Kohli by social activist H.M. Venkatesh. The Police have stated that the complaint will be considered under an already registered case and examined during the course of the…
— ANI (@ANI) June 6, 2025
कोहलीविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी : या कार्यक्रमादरम्यान स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे 50 चाहते जखमी झाले. तेव्हापासून संपूर्ण देशात अराजकता पसरली आहे. कर्नाटक सरकारनं यासाठी आरसीबी व्यवस्थापन, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनएला जबाबदार धरलं आहे, त्यानंतर कब्बन पार्क पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे आणि 4 जणांना अटक केली आहे. पण या सगळ्यामध्ये आता एचएम वेंकटेश नावाच्या एका स्थानिक व्यक्तीनं संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीविरुद्धही एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. या मागणीसह व्यंकटेश यांनी कब्बन पार्क स्टेशनवर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितलं की ते या तक्रारीचा विचार आधीच दाखल केलेल्या तक्रारीत करुन करतील. एकुणच विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
4 आरोपींना कोठडी : दुसरीकडे, शुक्रवारीच पोलिसांनी आरसीबीचे मार्केटिंग आणि महसूल अधिकारी निखिल सोसाळे आणि त्याचा सहकारी सुमंत यांना अटक केली. त्याच्याशिवाय, पोलिसांनी डीएनए मॅनेजमेंट कंपनीचे मॅनेजर किरण आणि त्याचा सहकारी मॅथ्यू यांनाही अटक केली. शुक्रवारीच या चौघांना बेंगळुरु येथील 41 व्या एसीजेएमसमोर हजर करण्यात आले, जिथून त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. या चौघांनाही प्रपन्ना अग्रहारा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.
हेही वाचा :