चेन्नई CSK vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) शुक्रवारी (28 मार्च) आमनेसामने येणार आहेत. चेन्नईनं त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) ला चार विकेट्सनं हरवलं होतं. दुसरीकडे, आरसीबीनं पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला सात विकेट्सनं पराभूत केलं होतं. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) इथं खेळवला जाईल.
𝐑𝐂𝐁 𝐯𝐬 𝐂𝐒𝐊: 𝐓𝐡𝐞 𝐒𝐨𝐮𝐭𝐡𝐞𝐫𝐧 𝐃𝐞𝐫𝐛𝐲, 𝐓𝐚𝐤𝐞 𝟏 - 𝐏𝐫𝐞𝐯𝐢𝐞𝐰
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 28, 2025
It’s time for a new chapter in this rivalry! It’s a chance to breach Chennai’s fortress. And the Royal Challengers are determined to Play Bold! 💪
Watch the passion, intensity and prep unfold… pic.twitter.com/si4u0ln8Qv
आरसीबीचा 17 वर्षांचा दुष्काळ संपेल : सीएसकेला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणं सोपं काम नाही. जर आपण इतिहासत पाहिलं तर, आरसीबीनं चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या घरच्या मैदानावर फक्त एकदाच हरवलं आहे आणि तेही 2008 मध्ये स्पर्धेच्या पहिल्या हंगामात. तेव्हापासून आरसीबीनं सलग आठ सामने गमावले आहेत. त्या सामन्यात फक्त स्टार फलंदाज विराट कोहलीच सहभागी होता, जेव्हा आरसीबीनं सीएसकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर विजय मिळवला होता. आता कोहली दुसऱ्यांदा सुपर किंग्जला त्यांच्याच घरात पराभूत करण्याचा प्रयत्न करेल. मात्र आरसीबीचा मार्ग सोपा नसेल. नेहमीप्रमाणे, चेन्नईचा संघ फिरकीपटूंना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्यांच्या घरच्या सामन्यांमध्ये विरोधी संघांना तगडी लढत देण्यासाठी सज्ज असेल.
Caption this 😅 pic.twitter.com/0x8y95gRSk
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 27, 2025
चेन्नई संघात दिग्गज फिरकीपटू : चेन्नई सुपर किंग्ज संघात अनुभवी रवींद्र जडेजा आहे, जो बराच काळापासून संघाचा भाग आहे. तर स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन देखील आता संघात पुन्हा सामील झाला आहे. चेन्नई संघानं अफगाणिस्तानचा डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज नूर अहमदचाही संघात समावेश केला आहे. ज्यानं मुंबई इंडियन्सविरुद्ध चांगली कामगिरी केली. या सामन्यातही चेन्नईची पारंपारिक खेळपट्टी पाहायला मिळेल आणि कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या फलंदाजांना अनुभवी गोलंदाजी आक्रमणाला हरवण्यासाठी त्यांचा खेळ सुधारावा लागेल.
It’s G-Day, and our OG is all ready to run it up! ⬆️💪#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/6JLiSDSPtZ
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 28, 2025
आरसीबी फलंदाजांवर अवलंबून : फिरकी गोलंदाजीचा सामना करणे हा नेहमीच विराट कोहलीचा फलंदाजीचा बलस्थान राहिला नाही, परंतु गेल्या दोन वर्षांत त्यानं या विभागात बरीच सुधारणा दाखवली आहे. या बदलामागील मुख्य कारण म्हणजे फिरकीपटूंविरुद्ध अधिक स्वीप आणि स्लॉग स्वीप खेळण्याची त्याची इच्छा आणि शुक्रवारी संध्याकाळी होणाऱ्या सामन्यात कोहलीला त्याची सर्व कौशल्ये दाखवावी लागतील. विराट कोहलीला फिल साल्ट, कर्णधार रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा यांसारख्या फलंदाजांच्या पाठिंब्याचीही आवश्यकता असेल.
Ready for another Kohli Choreography? We can’t wait! 😬 pic.twitter.com/PVZtoCj7QK
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 28, 2025
आरसीबी संघात बदल होण्याची शक्यता : चेपॉकची संथ खेळपट्टी लक्षात घेता, आरसीबी कदाचित टिम डेव्हिडच्या जागी जेकब बेथेलला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट करु शकते, जो डावखुरा फिरकी गोलंदाजीचा पर्याय देखील देतो. दुखापतीमुळं केकेआरविरुद्ध खेळू न शकलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या तंदुरुस्तीवरही संघ लक्ष ठेवेल आणि जर हा अनुभवी वेगवान गोलंदाज तंदुरुस्त असेल तर त्याला रसिक सलामच्या जागी प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट केलं जाईल.
FAN FRIDAY IT IS! 💛🥳
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 28, 2025
Start. The. Whistles! 🥳💪🏻🔥#CSKvRCB #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/lmy0BBm3KN
कोहलीशिवाय, धोनीवरही नजर : गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध शिवम दुबे, दीपक हुडा आणि सॅम करन प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जला आशा असेल की त्यांचा मधला क्रम पुन्हा फॉर्मात येईल. त्यांना रचिन रवींद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्याकडून अधिक पाठिंबा लागेल आणि महेंद्रसिंग धोनीकडून आणखी एका प्रभावी खेळीची अपेक्षा असेल. मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळू न शकलेल्या श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाच्या तंदुरुस्तीवरही सीएसके संघ लक्ष ठेवेल. जर पाथिराना पुन्हा फिटनेस झाला तर त्याला नॅथन एलिसच्या जागी संधी मिळू शकते.
Our driving force! 🦁💥#WhistlePodu #Yellove pic.twitter.com/CMTe2JOtQZ
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 28, 2025
हेड-टू-हेड रेकॉर्ड : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासावर नजर टाकल्यास, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आतापर्यंत 33 सामने खेळले गेले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्जनं 21 सामने जिंकले, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 11 सामने जिंकले. एक सामना अनिर्णीत राहिला.
- एकूण सामने : 33
- चेन्नई जिंकले : 21
- बेंगळुरु जिंकले : 11
- निकाल नाही : 1
💛🤝♥️#CSKvRCB pic.twitter.com/hLOiWkvFKH
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 27, 2025
CSK विरुद्ध RCB आयपीएलचा आठवा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु IPL 2025 मधील आठवा सामना 28 मार्च (शुक्रवार) रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल, नाणेफेक सायंकाळी 07:00 वाजता होईल.
CSK विरुद्ध RCB आयपीएलचा आठवा सामना कुठं आणि कसा पाहायचा?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क भारतात इंडियन प्रीमियर लीग 2025 चं अधिकृत प्रसारण करणार आहे. जिओ आणि स्टार स्पोर्ट्स इंडियाच्या विलीनीकरणानंतर, दर्शक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर आयपीएल सामने पाहू शकतात. याव्यतिरिक्त, ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी JioHotstar ॲपवर फ्रीमध्ये थेट उपलब्ध असेल, जेथे चाहते मोबाइल ॲप आणि वेबसाइटवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात.
Fighting is in his blood.🦁
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 27, 2025
Yellove is in his Veins! 💪#WhistlePodu #Yellove🦁💛 pic.twitter.com/bms9ILKd8r
दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग 12 :
चेन्नई सुपर किंग्ज : राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, नाथन एलिस, नूर अहमद, खलील अहमद.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली, फिल साल्ट (विकेटकीपर), देवदत्त पडिकल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार, यश दयाल, जोश हेझलवूड, सुयश शर्मा
हेही वाचा :