बेंगळुरु BCCI Action on RCB : आयपीएल 2025 चं विजेतेपद जिंकल्यानंतर, एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयी परेड आणि भव्य विजयोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान, स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. ज्यात 11 निष्पाप चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर, आरसीबीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या दोन अधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. या प्रकरणात एकाला अटकही करण्यात आली आहे. या सगळ्यात आरसीबी संघ अडकला आहे. या प्रकरणानंतर, बीसीसीआय आरसीबीला आयपीएल 2026 मध्ये सहभागी करुन घेण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते.
बीसीसीआय बंदी घालण्यासारखा मोठा निर्णय घेणार का? : आरसीबीच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या इतक्या मोठ्या चुकीसाठी कोण जबाबदार आहे याचा तपास सुरु आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयसमोर एक मोठा प्रश्न आहे की जर या चुकीमध्ये आरसीबी संघाचं नाव आलं तर ते पुढं काय निर्णय घेतील. आयपीएलमधील सर्व फ्रँचायझी व्यावसायिक संस्था म्हणून काम करतात, परंतु त्यांचा सहभाग बीसीसीआयच्या करारांद्वारे नियंत्रित केला जातो आणि त्या करारांमध्ये सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित अनेक कलमं समाविष्ट असतात. जर तपासकर्त्यांनी या गंभीर निष्काळजीपणाशी थेट आरसीबी व्यवस्थापनाचा संबंध जोडला, तर बीसीसीआयला न्याय देण्यासाठी आणि लीगची विश्वासार्हता राखण्यासाठी आरसीबीविरुद्ध मोठी कारवाई करावी लागू शकते.
The BCCI secretary has his say on the Chinnaswamy incident #RCB https://t.co/dBx35iXP42 pic.twitter.com/pRzgCllFmV
— Cricbuzz (@cricbuzz) June 6, 2025
काय म्हणाले BCCI सचिव : यातच बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी क्रिकबझशी बोलताना या घटनेवरुन मोठं वक्तव्य केलंय. सैकिया म्हणाले, 'काही पातळीवर बीसीसीआयला काहीतरी करावं लागेल. आम्ही गप्प राहू शकत नाही. हा आरसीबीचा खाजगी कार्यक्रम होता. पण, भारतातील क्रिकेटसाठी बीसीसीआय जबाबदार आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करु.'
Karnataka CM increases compensation for Bengaluru stampede victims' families to Rs 25 lakh each
— ANI Digital (@ani_digital) June 7, 2025
Read @ANI Story | https://t.co/5AUlhKZ3my#Bengaluru #Siddaramaiah #stampede pic.twitter.com/PnlitomDWQ
11 निष्पाप चाहत्यांचा मृत्यू अनेक जण जखमी : गेल्या मंगळवारी, आरसीबीनं पंजाब किंग्जचा पराभव करुन त्यांचं पहिलं विजेतेपद जिंकलं. त्यानंतर संपूर्ण संघ आणि बंगळुरुचे चाहते खूप आनंदी झाले. दुसऱ्या दिवशी, बुधवारी, संघ बेंगळुरुला पोहोचला, तिथं ते त्यांच्या चाहत्यांसोबत विजय साजरा करणार होते. पण हे उत्सवी वातावरण काही क्षणातच शोकात बदललं. लाखोंच्या गर्दीमुळं अचानक चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले.
हेही वाचा :