ETV Bharat / sports

हिरवी जर्सी घालून RCB संघ आजच्या सामन्यात उतरला मैदानात; काय आहे कारण? - RR VS RCB MATCH

इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 28वा सामना रविवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला जाईल. यात आरसीबी संघ मोठ्या बदलांसह उतरणार आहे.

RCB in Green Jersey
हिरवी जर्सी घालून RCB संघ आजच्या सामन्यात मैदानात (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 13, 2025 at 1:21 PM IST

1 Min Read

जयपूर RCB in Green Jersey : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 28व्या सामन्यात रविवारी दुपारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने येतील. आरसीबी संघ राजस्थानच्या होम ग्राउंड, सवाई मानसिंग स्टेडियममध्ये मोठ्या बदलांसह प्रवेश करणार आहे. आयपीएल 2025 च्या त्यांच्या सहाव्या सामन्यात आरसीबी त्यांच्या नियमित जर्सीमध्ये दिसणार नाही.

बदललेल्या जर्सीत उतरणार आरसीबी : वास्तविक राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आरसीबी हिरवी जर्सी घालून मैदानात उतरेल. बेंगळुरुस्थित ही फ्रँचायझी दरवर्षी एका सामन्यासाठी पुनर्नवीनीकरण केलेल्या कापडापासून बनवलेली हिरवी जर्सी घालते. त्याची सुरुवात 2011 मध्ये झाली. हिरवी जर्सी घालण्याचा उद्देश पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या गरजेबद्दल जागरुकता निर्माण करणं आहे.

आरसीबीचं पर्यावरणीय अभियान : आरसीबी ही कार्बन न्यूट्रल टी-20 फ्रँचायझी आहे. कार्बन पॉझिटिव्ह बनण्याच्या महत्त्वाकांक्षेसह, टीम त्यांच्या पर्यावरणीय मोहिमेत चाहत्यांना आणखी सहभागी करुन घेऊ इच्छिते. आरसीबीनं कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये स्टेडियममधील कचरा व्यवस्थापन आणि वर्गीकरण, सौरऊर्जेवर चालणारी प्रकाशयोजना आणि पवनऊर्जा यासारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर आणि पारंपारिक संसाधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इतर उपक्रमांचा समावेश आहे.

आरसीबीची आतापर्यंतची कामगिरी : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 18व्या हंगामाची सुरुवात विजयानं केली. पहिल्या सामन्यात आरसीबीनं कोलकाताला हरवलं आणि दुसऱ्या सामन्यात त्यांनी चेन्नई सुपर किंग्जला हरवलं. यानंतर, बेंगळुरुला गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. पुढच्याच सामन्यात, बेंगळुरुनं शानदार पुनरागमन केलं आणि मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं बेंगळुरुचा 6 धावांनी पराभव केला.

हिरव्या जर्सीमध्ये कामगिरी कशी : आता हिरव्या जर्सीमध्ये आरसीबी विजय नोंदवण्याचा प्रयत्न करेल. मात्र हिरव्या जर्सीमध्ये आरसीबीचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. बेंगळुरुनं आतापर्यंत हिरव्या जर्सीमध्ये 14 सामने खेळले आहेत. यात आरसीबीनं फक्त 4 सामने जिंकले आहेत. तर विरोधी संघानं 9 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

हिरव्या जर्सीमध्ये आरसीबीची कामगिरी :

  • एकूण सामने : 14
  • आरसीबी जिंकली : 4
  • प्रतिस्पर्धी संघाचे विजय : 9
  • निकाल नाही : 1

हेही वाचा :

  1. मुंबई लोकल विरुद्ध दिल्ली राजधानी... कोण जिंकणार सामन्याची शर्यत?
  2. 'पिंक सिटी'मध्ये पहिल्यांदाच होणार 'रॉयल' मॅच... कोण मिळवणार विजय?
  3. 'शर्माजी'च्या पोरानं पंजाबच्या किंग्जविरुद्ध केला रेकॉर्ड्सचा 'अभिषेक'; शतकाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.