पॅरिस Neeraj Chopra : भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये तिरंगा फडकवला आहे. तो 88.16 चा थ्रो टाकून सर्व खेळाडूंपेक्षा पुढं होता. गेल्या दोन वेळा तो जर्मनीच्या ज्युलियन वेबरपेक्षा मागे होता, परंतु पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये त्याने वेबरला एकही संधी दिली नाही आणि पहिलं स्थान पटकावलं.
नीरज चोप्राचे तीन थ्रो फाऊल : या लीगमध्ये नीरज चोप्रानं त्याच्या पहिल्याच प्रयत्नात 88.16 मीटर थ्रो केला, जो पॅरिस डायमंड लीग 2025 मधील त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला. त्यानंतर, दुसऱ्या प्रयत्नात त्यानं 85.10 मीटर थ्रो केला. त्यानंतर त्याचे पुढचे तीन थ्रो फाऊल ठरले. सहाव्या थ्रो मध्ये त्यानं 82.89 मीटर थ्रो केला. तर नीरजचा प्रतिस्पर्धी ज्युलियन वेबरला भाला तेवढा फेकता आला नाही. पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये त्याचा सर्वोत्तम थ्रो 85.10 होता. त्यामुळं त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पण वेबरचा एकही थ्रो फाउल झाला नाही. तर ब्राझीलच्या लुईझ मॉरिसियो दा सिल्वानं तिसरं स्थान पटकावलं. त्यानं 86.62 मीटर थ्रो केला.
AND OUR CHAMP WINS THE PARIS DL 💎
— The Khel India (@TheKhelIndia) June 20, 2025
1️⃣ Neeraj Chopra 🇮🇳 88.16m
2️⃣ Julian Weber 🇩🇪 87.88m
3️⃣ Da Silva 🇧🇷 86.62m https://t.co/8SjQD3srJR pic.twitter.com/zxUVkG1VZA
दोन पराभवांचा घेतला बदला : 16 मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये ज्युलियन वेबरनं नीरज चोप्राचा पराभव केला होता. जिथे वेबरनं 91.06 मीटरच्या अंतिम थ्रोसह पहिलं स्थान पटकावलं होतं. तर चोप्रा 90.23 मीटर फेकून दुसऱ्या स्थानावर राहिला. तसंच 31 वर्षीय वेबरनं 23 मे रोजी पोलंडमधील जानूझ कुसोसिंकी मेमोरियल स्पर्धेतही चोप्राला हरवलं होतं. वेबरनं तेव्हा 86.12 मीटर आणि चोप्रानं 84.14 मीटर थ्रो केला होता. आता नीरजनं दोन्ही पराभवाचा बदला घेतला आहे.
या विजयामुळं मिळणार नाही पदक : डायमंड लीग जिंकण्यासाठी कोणतंही पदक मिळत नाही. प्रत्येक स्थानावर असलेल्या खेळाडूंना गुण मिळतात. या गुणांच्या आधारे वर्षाच्या अंतिम डायमंड लीगमध्ये स्थान मिळतं. नीरजचे सध्या 15 गुण आहेत आणि तो ज्युलियन वेबरसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. ऑलिंपिक खेळांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नीरजनं गेल्या वर्षी पॅरिस डायमंड लीगमध्ये भाग घेतला नव्हता म्हणून हा विजय महत्त्वाचा आहे. ऑलिंपिकमध्ये त्यानं 89.45 मीटर फेकून रौप्य पदक जिंकलं होतं.
पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राची कामगिरी :
- पहिला प्रयत्न - 88.16 मीटर
- दुसरा प्रयत्न - 85.10 मीटर
- तिसरा प्रयत्न - फाउल
- चौथा प्रयत्न - फाउल
- पाचवा प्रयत्न - फाउल
- सहावा प्रयत्न - 82.89 मीटर
हेही वाचा :